शुक्र ग्रहाची मराठी माहिती | Venus Planet Information In Marathi

  • व्यास. 7600 मैल
  • सूर्याभोवती एक फेरी. 225 दिवस
  • सूर्यापासूनचे अंतर. 6,70,00,000 मैल

सूर्याच्या ग्रहमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र हा होय.

शुक्र हा अंतर्गत आहे भर दिवसा ही शुक्र आपणास आकाशात दिसतो.

शुक्राचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 6,70,00,000 मैल आहे.

सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास शुक्राला 225 दिवस लागतात.

शुक्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 0.83 इतकी आहे तर आकारमान पृथ्वीच्या आकारमानाच्या 0.88 एवढे आहे.या ग्रहाचा व्यास 7600 मैल आहे.

त्याची सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याची कक्षा साधारणता वर्तुळाकार आहे.

वर्तुळाकार कक्षेमुळे त्याच्या पृथ्वीपासूनच्या जवळच्या आणि दूरच्या अंतरात फारसा फरक पडत नाही.

शुक्र आणि पृथ्वी ज्यावेळी एकमेकांच्या जवळ येतात त्याचवेळी त्यांच्यातील अंतर साधारणता 2 कोटी 50 लाख मैल इतके असते.

त्यावेळी शुक्रतारा अधिक तेजस्वी दिसतो दुसरा कोणताही ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळ येत नाही.

शुक्र या ग्रहाला ही बुध ग्रहाप्रमाणेच कला आहेत दुर्बिणीतून या कला आपण पाहू शकतो शुक्र ग्रह अपारदर्शक ढगांनी पूर्णपणे वेढलेला असल्याने त्यावरून सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे परावर्तित होत असल्याने तो आपणास जास्त तेजस्वी दिसतो.

Leave a Comment