राजा राम मोहन रॉय मराठी माहिती|Raja Rammohan Roy

नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण राजा राम मोहन राय मराठी माहिती Raja Ram mohan Roy Information In Marathi या विषयावर माहिती घेणार आहोत. हे 19 व्या शतकातील भारतीय सुधारक होते. जे शिक्षण धर्माच्या प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात, तसेच त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणून देखील संबोधले जाते.

राजा राम मोहन राय जीवन परिचय मराठीत | Raja Rammohan RoyBiography In Marathi

संपूर्ण नाव -राजा राम मोहन राय

जन्मतारीख – 22 मे 1772

जन्मगाव – जिल्हा हुबळी गाव राधानगर

आई व वडील यांचे नाव – तेरीनी देवी व रामकांतो रॉय

शिक्षण – कायदा व तत्त्वज्ञान यांचे शिक्षण, वेध शिक्षण

सामाजिक कार्य – सतीबंदीचा कायदा, ब्रह्म समाजाचे संस्थापक, विधवा पुनर्विवाह ,बालविवाह बंद

मृत्यू – 27 सप्टेंबर 1833

भारतातील पहिले समाजसुधारक इ. स सन 1829 वर्षी सतीची चाल बंद करण्यासाठी चळवळ करून विल्यम यांना सतीबंदीचा कायदा करण्यास तसेच इतर सामाजिक समस्या सोडवण्यास मदत केली.

बालविवाह सारख्या अनिष्ट रूढींना मुरमाती देऊन सामान्यांना जीवनात नवीन प्रेरणा निर्माण केली.

नवभारतातील पहिले महान सुधारक व ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन राय (Raja Rammohan Roy)यांचा जन्म एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. परंतु मोठेपणी धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या घातक रूढी नष्ट करून शुद्ध धर्माची स्थापना व्हावी म्हणून त्यांनी “आत्मीय” सभा स्थापन करून तिचे नियमितपणे धर्मचर्चा घडवून आणून आपली मते मांडायला सुरुवात केली. आणि बालिका वृद्ध विवाह बालविवाह यांवर टीका सुरू केली
त्यांचे आजोबा व पंजोबा बंगालच्या नवाबाच्या दरबारात मोठ्या हुद्द्यावर होते. त्यामुळे नवाबाने त्यांना रॉय हा सन्मानदर्शक किताब बहाल केला परंतु हे घराण्याचे आडनाव झाले.

त्यांचे बंगाली, फारशी, संस्कृत भाषांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. सर्व धर्मांचा अभ्यास केला. वडिलांनी त्यांना ज्ञानी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

परंतु राजाराम मोहन जेव्हा देव एकच असून मूर्तीची पूजा करणे हे अज्ञान आहे हा विचार उघडपणे बोलू लागला तेव्हा मुलगा धर्मभ्रष्ट झाला आहे. समजून आई-वडील अतिशय दुःखी झाले. राजाराम मोहन रॉय जेव्हा अभ्यासासाठी तिबेटला गेले, पण तिथे मूर्तींची पूजा चालूच असल्याचे पाहून नाराज झाले.

राजा राम मोहन राय यांचे सामाजिक कार्य मराठीत माहिती |Raja Rammohan Roy social Work In Marathi

विधवा पुनर्विवाह चे उघड प्रचारक हे आहे त्याचप्रमाणे इंग्रजी शिक्षण त्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसात केले, त्यामुळे त्यांना इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हटले जाते.

घराबाहेर पडलेल्या राममोहन यांना आईची आठवण येताच घरी आले. आईने त्यांचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यामुळे नोकरी करणे आवश्यक होते. नंतर आठ नऊ वर्षांनी नोकरी सुद्धा सोडली आणि आपल्या विचारांचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. त्या काळात धर्म हा समाजाचा प्राण होता मात्र सर्व धर्मांना ग्लानी आली होती. नीतिमत्ता ढासळून अद्वेत संपले. प्रेमाचे जागा द्वेषांनी घेतली. जातीयतेने काहूर माजवले होते. सती जाणाऱ्या आपल्या भावजय यांचे जीव वाचविण्यासाठी केवील वाणी धडपड व परंपरा वादींनी तिचा घेतलेला बळी राममोहन यांना पाहिला गेला नाही. या अमानुष अ मानवी रूढींचे भंजन कायद्यानेच करण्याचा विडा त्यांनी उचलला. पाश्चिमात्य, पौरात्य,धर्म संस्कृती यांचा अभ्यास केला राजाराम मोहन रॉय आपल्या पत्रकारितेमुळे व ग्रंथ लेखनामुळे जगात प्रसिद्ध झाले.

ब्राम्हो समाजचे संस्थापक म्हणून त्यांचे नाव प्रख्यात आहे.

भारतातील अनिष्ट प्रथा नष्ट करून सामाजिक सुधारणा घडवून आणणारा शिल्पकार म्हणून राजाराम मोहन राय यांना ओळखले जाते .

मोगल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला. आणि राजाराम मोहन रॉय झाले. आपल्या मागण्यांची तरफदारी करण्यासाठी दिल्लीच्या बादशहाने आपले वकील म्हणून इंग्लंडला पाठवले सतीची दुष्ट रूढी बंद करण्यासाठी कायदा करून घेतला. ब्राह्मो समाजाची स्थापना करून एकेश्वर वादाचा पुरस्कार केला. भारतातला महान समाज सुधारक म्हणून जग पाहू लागले.

ब्राह्मो समाज

राजा राम मोहन राय यांनी मूर्ती पूजेला विरोध केला त्याचप्रमाणे देवी देवतांच्या मूर्ती यांचे पूजन करण्यास त्यांनी विरोध केला ते म्हणत की जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे तो म्हणजे निराकार व निर्गुण कारला बाह्य झालेल्या रूढी परंपरा यांचा त्यांनी जोरदार विरोध केला. भारतातील समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याचप्रमाणे भारत देशातील अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था यांविषयी लिहिण्यासाठी काही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी 4 डिसेंबर 1821 रोजी कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र सुरू केले.

सती प्रथा

ही अतिशय अप्रचलित अग्नीदहन प्रथा आहे. या प्रथेमध्ये एखाद्या महिलेचा पती गेल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस त्या पत्नीला जिवंत त्याच्या चितेवर उडी मारून आत्मदहन करण्याची किंवा तिला जिवंत जाळले जायचे.

ह्या प्रथेचा उल्लेख ख्रिस्ती पूर्व 3 ऱ्या शतकात झाला, पण या प्रथेचा पुरावा पाचव्या व नवव्या शतकांपासून आहे. हिंदू व सिख घराण्यांमध्ये ही  प्रथा मोठ्या प्रमाणात होती. शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाई याही आपल्या पती नंतर सती गेल्या होत्या. दक्षिण आशियामध्ये देखील काही ठिकाणी ही प्रथा होती.

राजा राम मोहन राय यांचे धार्मिक कार्य

राजाराम मोहन रॉय हे 19व्या शतकातील भारतीय समाज सुधारक आणि धार्मिक नेते होते ज्यांना भारतीय अपूर्ण जागरणाची जनक मानले जाते त्यांचा जन्म 22 ने 1772 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील राधानगर गावात झाला राजाराम मोहन राय यांच्या धार्मिक कार्याचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे एकेश्वर वाद्याचा पुरस्कार केला त्यांचा असा विश्वास होता की एकच सर्व शक्तिमान देव ही संकल्पना धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाणारे एक वैश्विक सत्य होते. /

1)एकेश्वर वादाचा प्रसार
राजा राम मोहन रॉय हे एकेश्वर वादाचे एका ईश्वरातील विश्वासाचे ठाम समर्थक होते त्यांचा असा विश्वास होता की एकच सर्व शक्तिमान देव ही संकल्पना धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाणारे एक वैश्विक सत्य आहे ज्यांनी हिंदू धर्मात या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न केला शेवटी राजाराम मोहन राय चे भारतात एकेश्वर वादाचा प्रसार करण्याचे प्रयत्न हे धार्मिक सुधारणा आणि श्रेष्ठतेला चालना देण्याचा त्यांच्या मोठ्या मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे.
2) मूर्ति पूजेला विरोध
राजाराम मोहन राय हे देखील मूर्ती पूजेचे दे मूर्ती पूजेचे देवतेचे प्रतिनिधित्व म्हणून भौतिक वास्तू किंवा प्रतिमांची पूजा करण्याचे विरोधक होते त्यांचा असा विश्वास होता की मूर्तिपूजा ही खऱ्या धार्मिक सहित समजूतीमध्ये अडथळा आहे आणि व्यक्तींना प्रत्यक्ष देवीची जोडणे आवश्यक आहे राजाराम मोहन रॉय यांच्या मूर्ती पूजेचा विरोध हे त्यांच्या एकेश्वर वादातील विश्वासाचे मूळ होते त्यांनी भारताच्या धार्मिक परिदृश्याला आकार देण्याचा आणि धर्माकडे अधिक अंतर मुक्ती दृष्टिकोनाचा पाया घालण्यास मदत केली.
3) धार्मिक सहिष्णुता
धार्मिक संहिष्णुता हा राजाराम मोहन रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि कार्याचा मूळ सिद्धांत होता असा विश्वास होता की सर्व धर्म समभाव आहे त्यांचा छळ किंवा भेदभाव न करता त्यांच्या प्रसंतीच्या धर्माचे पालन करण्याचा अधिक आहे त्यांच्या वकिली कार्याशिवायत राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली राजाराम मोहनांची धार्मिक संस्कृतीची बांधिलकी हा सामाजिक सलोखा आणि सहकार्याला चालना देण्यात देण्याचा मोठा मिशनचा एक महत्त्वाचा भाग होता ब्राह्मो समाज हा बौद्धिक आणि अध्यात्मिक क्रियाकल्पांचा केंद्र बनला आहे त्याने विविध धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांना आकर्षित केले ज्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधण्यास ठरवता .

राजा राम मोहन राय आधुनिक भारताचे जनकराजाराम मोहन राय यांना 19 व्या शतकातील भारतीय समाजासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते ते एक दूरदर्शी समाज सुधारक होते ज्यांनी भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांना चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला एकूणच राजाराम मोहन राय यांचे भारतीय समाजातील योगदान परिवर्तनवादी आणि दुर्गामी होते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणासाठी पाया घालण्यात मदत झाली या कारणामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक मानले जाते.

राजाराम मोहन रॉय यांचे वर्तमानपत्र व साहित्य

  • वेदांत ग्रंथ
  • संवाद कौमुदी
  • मीरात उल अखबार
  • गवडी या व्याकरण
  • 1824 वर्षी बंगाली या भाषेत इतिहास व भूगोल या विषयाच्या पुस्तकांचे लिखाण

राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू मराठीत | Raja Rammohan Roy Deth In Marathi

राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 1833 ला मेंदू ज्वर या आजाराने इंग्लंडमध्ये झाला.

Leave a Comment