हरिश्चंद्रगड मराठी माहिती |Harishchandragad Fort Information In Marathi

नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण हरिश्चंद्र गड मराठी माहिती Raja Ram Harishchandra Fort Information In Marathi या विषयावर माहिती घेणार आहोत.हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.पुणे नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हरिश्चंद्र गड आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे व पिंपळगाव जोग धरणाच्या सानिध्यात हा किल्ला आहे.

ठाणे ,पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो, याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड होय. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठा यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. तर हरिश्चंद्रगडाला दोन-चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे .

साडेतीन हजार वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभूषण कडे कपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या गडाचा उल्लेख प्राचीन अति पुरातन व मत्स्य पुरातन काळातील आढळतो. १९४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होती. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही वेगळेच असते. वनस्पतींची विविधता या गडावर जेवहाडी तेव्हडी इतरत्र कुठेही आढळणार नाही . करवंदीच्या जाळ्या,घाटी ,उक्षी ,मदवेल, कुडा ,पांगळी, ढेकळ, पानफुटी ,गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणी शिकारीमुळे बरेच कमी झाले आहे तरी कोल्हे, तरस ,रानडुकरे ,बिबट्या ,ससे, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामती वरून नाणेघाट, जीवधड, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसुबाई ,अलंग ,मदन, कुलूंद, भैरवगड ,हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो, अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरीच ठरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या नयनरम्य सोहळा पाहण्यास जो आनंद आहे तो निशब्द करणारा आहे. येथे इंद्रप्रस्थ म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य पाहण्यासाठी गर्दी जमते.सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.
घनदाट जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट वाटेत लागणारे कारवी करवंदांचे रान, सोबत करणारे नदी-नाले, उंच कडे, अवघड अजस्त्र खिंडी, क्षणोक्षणी रोमांचित करतात.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलामध्ये नाना प्रकारचे पशुपक्षी पाहायला मिळतात, त्यामध्ये कोल्हे,भेकर,तरस,बिबट्या,ससा यासारख्या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा या हरिश्चंद्रगड किल्ल्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोघलांनी घेतला व त्यानंतर १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला.

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.

हरिश्चंद्रगडावरील लेणी या गुहा गडभर पसरलेल्या आहेत. यापैकी बऱ्याच लेणी या तारामती शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत आणि राहण्याचे ठिकाण आहेत. काही मंदिराजवळ आहेत, तर काही किल्ल्याजवळ आहेत आणि काही दूर जंगलात आहेत. गडाच्या वायव्येला कोकणकड्याच्या उजवीकडे ३० फूट खोल नैसर्गिक गुहा आहे. इतर अनेक गुहा अजूनही सापडलेल्या नाहीत असे म्हटले जाते.

खिरेश्वर जवळील असलेले नागेश्वर मंदिर हे एक उत्तम पुरातन बांधकाम आहे, आणि यावर विविध कलात्मक कामे पाहायला मिळतात. मंदिराच्या छतावर कोरीव काम केलेले आहे. येथील कोरीव कामांचे मुख्य आकर्षण म्हणजे निद्रावस्थेतील भगवान विष्णूचे १.५ मीटर लांब शिल्प, जे मराठीत “शेषशायी विष्णू” म्हणून प्रसिद्ध आहे. हे दुर्मिळ आहे आणि म्हणूनच त्याला खूप महत्त्व आहे. या शिल्पाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. मंदिराजवळ गुहा आहेत.

गणपती, हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे मंदिर प्राचीन भारतात प्रचलित असलेल्या दगडांमधून शिल्प कोरण्याच्या उत्कृष्ट कलेचे अद्भुत उदाहरण आहे. हे त्याच्या पायथ्यापासून सुमारे १६ मीटर उंच आहे. या मंदिराभोवती काही गुहा आणि प्राचीन पाण्याची टाकी आहेत. मंगल गंगा नदी मंदिराजवळ असलेल्या एका टाक्यातून उगम पावते असे म्हटले जाते. मंदिराचा वरचा भाग उत्तर-भारतीय मंदिरांच्या बांधकामासारखा आहे.

येथे आपण अनेक थडग्या पाहू शकतो, ज्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम दिसते. हे दगड एकमेकांच्या वरती व्यवस्थित मांडून बांधलेले आहेत. मंदिराजवळ तीन मुख्य गुहा आहेत. मंदिराजवळील टाकी पिण्याच्या पाण्याची सोय करतात. थोड्याच अंतरावर काशीतीर्थ नावाचे दुसरे मंदिर आहे. या मंदिराची आकर्षक गोष्ट म्हणजे ते एकाच मोठ्या खडकात कोरले गेले आहे. चारही बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर चेहऱ्याची शिल्पे आहेत. हे मंदिराच्या रक्षकांचे चेहरे आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला संत चांगदेवांचा देवसनागश्री शिलालेख आहे



हरिश्चंद्र गड किल्ल्याचा इतिहास


हरिश्चंद्रगडाची निर्मिती केव्हा झाली हे जरी सांगता येत नसले तरी या किल्ल्याच्या पोटात असणाऱ्या लेण्यां वरून हा किल्ला अति प्राचीन असावा. हरिश्चंद्र तारामती यांच्या उल्लेखामुळे तो आपल्याला पुराण काळात घेऊन जातो. स्थानिक कथांमधून या किल्ल्याचा संबंध राजा हरिश्चंद्राची जोडला जातो. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख अग्निपुराण मत्स्यपुराण यासारख्या पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. योगिराज संत चांगदेव यांनी हरिश्चंद्रगडावर तपश्चर्या केली, तपश्चर्येनंतर लिहिलेल्या तत्वसार ग्रंथामध्ये हरिश्चंद्रगडाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आढळते.
हरिश्चंद्रगडाचा इतिहासामध्ये जास्त कुठे उल्लेख आढळत नाही. आदिवासी महादेव कोळी समाजाचे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये विशेष वर्चस्व होते. त्यामुळे हा किल्ला शेवटपर्यंत महादेव कोळी समाज्या कडे होता. १७४७ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी कोळी समाजातील कृष्णाची शिंदे यांच्याकडे दिली. ईस्ट इंडिया कंपनी कडे जाईपर्यंत किल्ला मराठ्यांकडे होता. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे होते (आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे) इस १८१८ मध्ये ब्रिटिशांनी किल्ला जिंकून घेतला व किल्ल्यावरील वास्तू नष्ट केल्या.

तोलारखंड

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी ‘यू’ आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही दैदिप्यमान आहे.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.

ऐतिहासिक महत्त्व



महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.

या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदिरे ही या जमातीचे प्रतीक आहेत. तसेच महादेव कोळी समाजाचा निकरीचा असणारा इंग्रज, सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढ्याचे हे एक प्रतिक आहे.

१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळु या नद्यांचा उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.

हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.

राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ – २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 4 कि.मी. आहे.
हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबीत, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणाऱ्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

Leave a Comment