श्री सोमनाथ मंदिर मराठी माहिती |Shri Somnath  Temple Information In marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिले ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ या मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत


“जय सोमनाथ – जय सोमनाथ” या जयघोषाने गुजरात मधील सौराष्ट्रात प्रभासपट्टणम गावाचा सारा परिसर दणाणून निघत असे.एवढेच काय तर मंदिर घाटाच्या पायांना समुद्राचा लाटा येऊन आढळतात त्यावेळेस जय भोलेनाथ धीर गंभीर असा आवाज येतो. याचबरोबर सोमनाथ मंदिर मध्ये सोन्याची म्हणजेच सुवर्ण मंदिरसुवर्णांच्या विशाल घंटेतून उमटणारा “ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय” च्या जयघोषाने सारा परिसर भक्तीमय करून टाकत होता.या मंदिरातील ती विशाल सुवर्ण घंटा 200 मन सोन्याची होती आणि मंदिराचे 56 खांब हिरे मानके पाचू आधी रत्नांनी मडवलेले होते. मंदिराच्या गर्भ गृहात देखील रत्नदीप यांची आरास रात्रंदिवस देवत असायची. आणि हो बरं का कनोजी अरण्ये जवळ जळणारा नंददीप अखंड प्रज्वलित असायचा मंदिराच्या भंडारगृहात अमाप संपत्ती ठेवलेली होती. भगवान सोमनाथांच्या रोजच्या पूजा व अभिषेकासाठी हरिद्वार प्रयाग काशी येथून रोज गंगाजल आणले जाई. एवढेच नाही तर काश्मीर मधून पूजेसाठी फुले येत असत. रोजच्या पूजेसाठी जवळपास एक हजार विद्वान ब्राह्मण नियुक्त केले होते. मंदिरात चालणाऱ्या नृत्य गायन अधिक कार्यक्रमांसाठी जवळपास साडेतीनशे नर्तिका व नृत्यांगनांची नेमणूक केलेली होती. या धार्मिक संस्थानाला दहा हजार गावांचा महसूल इनामी होता. श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग सोमनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते.
हे स्वयंभू व सदा जागृत देवस्थान असल्याने लाखो भक्त येथे येऊन पवित्र पावन बनत असत. येथे येणार हा प्रत्येक जण शिवशंकराच्या नावात दंग होऊन शिवशंकराचा जयघोष करत असतो भक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीने या देवस्थानाचे भंडार सदा भरलेले असायचे. यासोबतच अग्निपूजक विदेशी व्यापाऱ्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम या पवित्र देवाच्या भंडाऱ्यात समर्पित केल्याने ती संपत्ती अफाट वाढली.
सौराष्ट्रातील श्री सोमनाथ त्याचे हे शिवतीर्थ आणि सूर्य तिर्थ सर्वप्रथम चंद्राला प्रसन्न झाले त्यानंतर त्याने भारतात सर्वप्रथम श्री शंकराच्या दिव्य ज्योतिर्लिंगाची स्थापना करून त्यावर अतिशय सुंदर व भव्य मंदिर बांधले. स्कंद पुराणाच्या प्रभास खंडात याबाबतच्या कथेचा प्रसंग आहे ती कथा अशी आहे .

श्री सोरटी सोमनाथ मंदिराची कथा मराठीत| Shri somnath Temple Story In Marathi

चंद्राने दक्ष राजाच्या 27 मुलींची विवाह केला होता पण चंद्र फक्त रोहिणीशी त्याने आपला फार अनुरोध व प्रेम दाखवले. त्याच्या या कृत्याने त्याच्या अन्य 26 पत्नी स्वतःला अपेक्षित व अपमानित समजू लागल्या. काही दिवसानंतर आपल्या पतीकडून निराश झाल्यामुळे त्यांनी याबाबत आपल्या वडिलांकडे म्हणजे दक्ष राजाकडे तक्रार केली. मुलींच्या दुःखाने पीडित दक्ष राजाने आपला जावई असलेल्या चंद्राला दोन वेळा परपरीने समजावून पाहिले पण चंद्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे रागवलेल्या दक्ष राजाने चंद्राला अक्षय क्षय होण्याचा शाप दिला चंद्राला मिळालेल्या शापामुळे व्यतीत होऊन सर्व देवाने ब्राह्मण देवाजवळ जाऊन प्रार्थना केली की या शापातून चंद्राच्या मुक्तीचा उपाय विचारला.

ब्रह्मदेवाने यावर उपाय सांगितला तो असा चंद्राने प्रभास क्षेत्रीय जाऊन महामृत्युंजय मंत्राद्वारे वृषभध्वज भगवान श्री शंकराची उपासना करावे त्याप्रमाणे चंद्राने सहा महिने कठोर तप केले सहा महिन्यानंतर भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी प्रसन्न होऊन चंद्राला वर दिला की महिन्यातील एका पक्षात दररोज चंद्राची एक एक कला नष्ट होईल व नंतरच्या दुसऱ्या पक्षात त्याची दररोज एक कला वाढेल पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसेल चंद्राच्या व देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन प्रभास क्षेत्राचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि चंद्राचे म्हणजेच सोमाचे म्हणजेच चंद्राचे दुःख दूर करण्यासाठी सोमेश्वर या नावाने भगवान शंकर तेथे प्रकट झाले त्यामुळे देवाने त्या ठिकाणी सोमेश्वर कुंडाची स्थापना केली. या कुंडात नेहमी पाणी असते या कुंडात स्नान केल्यानंतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता. सोमेश्वर अर्थात सोमनाथाच्या दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन केल्यास सर्व पापांचा नाश होऊन मुक्ती मिळते.
चंद्राचे एक नाव सोम असे आहे. त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ पडले. तसेच चंद्राला या ठिकाणी त्याचे तेज पुन्हा मिळाले म्हणून हे क्षेत्र प्रवासपट्टण या नावानेही ओळखले जाते काही काळानंतर मंदिराचा जिर्णोद्धार करताना रावण या शिवभक्ताने हे मंदिर रूप्याने तर श्रीकृष्णाने चंदनाने मंदिर बांधले . श्री सोमनाथाच्या या वैभव संपन्न पवित्र स्थानावर देखील मुस्लिम बांधवांची अनेक आक्रमणे झाली ही 722 मध्ये सिंध प्रांताचा सुभेदार असलेल्या जुमानने येथे सर्वप्रथम हल्ला केला होता.चुंबकीय चमत्कारांच्या कौशल्याने अंधारात ही दिसणारी श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गजनीच्या मोहम्मद गौरीने आक्रमण करून फोडली. तो अशुभ दिवस होता शुक्रवार दिनांक 11 मे 1025 तेव्हापासून गजनीच्या मोहम्मदला मूर्तीभंजक म्हटले जाते .या दिवशी त्याने जवळपास 17 कोटी रुपयांची संपत्ती लुटली होती यानंतर इ.स 1783 मध्ये शिवभक्त , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी श्री सोमनाथ देवाचे नवे मंदिर उभारले. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर गुजरातचे सिंह सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा शेवटी सोमनाथाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. यासाठी त्यांना महाराष्ट्रातील काकासाहेब गाडगीळ यांनी सल्ला दिला होता. या जीर्णोद्धारामुळे भारतीय शिल्पकलेचा स्वर्गीय सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना या भावनेने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधले गेले. शुक्रवार दिनांक 11 मे 1951 रोजी सकाळी 9.46 वाजता या भव्य मंदिरात श्री सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभहस्ते वेदमूर्ती तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वेदमंत्र घोषात अतिशय उत्साहात व वाजत गाजत करण्यात आली .भारताचे हे आद्य ज्योतिर्लिंग कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे .लाखो भाविक येथे येतात अनेक सिद्ध तत्पुरुष यांचा सत्संग लोकांना घडतो. दानशूर लोकांच्या दाणामुळे सोमनाथाच्या वैभववाला पुन्हा झळाळी प्राप्त होते नास्तिकांनी मंदिराचा विध्वंस केला होता पण भारतीयांची श्रद्धा व अभिमानालाही कोणीही तोडू शकले नाही .या श्रद्धेने साक्षात प्रतीक म्हणजे श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग होय. समुद्रकिनाऱ्यावर काठेवाड प्रदेशात प्रभास पटनांच्या आजूबाजूला अनेक मंदिर स्मारक आणि पौराणिक ठिकाणी आहेत त्यातील काही प्रसिद्ध आहेत त्यातच एक सूर्य मंदिर फार प्रसिद्ध आहे या अति प्राचीन मंदिरात आज मूर्ती नाही पण त्याच्या शेषांवरून या मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्टतेचा प्रत्यय येतो. तसेच एक पौराणिक ठिकाण आहे भलांत भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला व्याघ्राने मारलेला बाण लागला होता त्या बाणाच्या जखमेतून जिथे रक्त गळाले ते स्थान म्हणजे भलांतक तीर्थ होय. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे याच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रा मिळाली कार्तिकी पौर्णिमेला येथे फार मोठी जत्रा भरते. भारतातील कोणत्याही ठिकाणांनी सोरटी सोमनाथ ला जाण्याकरता आमदाबाद पर्यंत राष्ट्रीय महामार्गाने जाऊन पुढे गुजरात राज्य मार्गाने सोरटी सोमनाथला जाता येते.
काठीयावाडच्या कुशःव्रत क्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने सोन्याची द्वारका बनविली होती. पुढे कालांतराने याच कुश धर्माचे मुसळ बनले. व त्याच्या प्रहार आणि यादवांचा सर्वनाश झाला. श्रीकृष्ण व बलराम या घटनेमुळे फार व्यतित होते. पण बलरामाने एक समुद्री गुहेत प्रवेश करून आपले अवतार कार्य संपविले. आजही ती गुहा येथे आहे.
याच भागात हिरण्या नदीवर एक विशाल घाट बांधलेला आहे. या घाटावरच भगवान श्रीकृष्णाचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. आज येथे एक भव्य स्मारक व गीता मंदिर उभारण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहावर जिथे अंतिम अग्निसंस्कार झाला त्या ठिकाणी आता श्रीकृष्णाचे स्पटिक मूर्ती स्थापन केली आहे. त्या मूर्तीचे दर्शन घेताना श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांची रास क्रीडा, महाभारतातील प्रसंग, त्यांच्या गीता उपदेश व अवतार कार्याची सगळ्या कथा भाग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो याच प्राथस्पटांच्या परिसरात प्राचीन काळी अगस्ती ऋषींनी समुद्राचे प्राशन केले. रावण ,पांडव ,जनमेजय आधी अनेक पुराण प्रसिद्ध व्यक्तींनी या क्षेत्राचे दर्शन केलेले आहे. माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला येथे श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे फार मोठी यात्रा भरते. इ.स 1297 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या सरदार आणि याला सोरटी सोमनाथ येथे पाठवून मंदिराची तोडफोड केली. त्यानंतर इ.स 1470 मध्ये मोहम्मद बेगड इ.स पंधराशे तीन मध्ये दुसरा मुदफळशहा आणि इ.स 1701 मध्ये धर्मार्थ औरंगजेबाने शेवटी सोमनाथाचे मंदिर भ्रष्ट केले तोडफोड केली अनेक शाहिद अनेकांची हत्या केली. व अमाप संपत्ती लुटून नेली.
सोरटी सोमनाथ येथे शंकर भगवान यांची अतिशय सुंदर असे शिवलिंग आहे तिथे गेल्यानंतर आपले मन तेथे रमते तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते. तेथे खाली अनेक ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. तिथे आपण विश्रांती घेऊन पुढे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतो तेथील दोनशे मन सोन्याचे घंटा बघण्यासाठी लांब लांबून भाविक येत असतात मंदिराच्या पावित्र्य टिकून ठेवलेले आहे.
सर्व शिवभक्तांना “जय भोलेनाथ हर हर महादेव”

Leave a Comment