श्री वैद्यनाथ मंदिर मराठी माहिती | Shri Vaijnath Temple Information In marathi



कन्याकुमारी ते उज्जैन अशीच जर एक काल्पनिक रेषा ओढली तर त्या रेषेवर परळी हे गाव आपल्याला दिसून येईल. मेरू पर्वत म्हणजेच नागनारायण पर्वताच्या उतरणीवर हे गाव वसलेले आहे. परळी हे गाव ब्रह्मा, वेणू आणि सरस्वती या तीन नद्यांच्या परिसरात वसलेले असून अतिशय प्राचीन आहे. तेथे श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ यांचे पवित्र शिवलिंग आहे. त्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढले आहे कांतीपुर मध्यरेखा वैजयंती आणि जयंती या नावाने ही क्षेत्र ओळखले जाते. या शिवक्षेत्रावर शंकर व पार्वती सोबतच निवास करतात आणि बारा ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त परळीतच दोघांचीही एकत्र निवास आहे.

त्यामुळे या शहराला अनोखी काशी असेही म्हणतात. या आगळ्यावेगळ्या महत्त्वामुळेच परळीच्या लोकांना काशी यात्रा करण्याची गरज नाही. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पासून फक्त 26 किलोमीटरवर हे तीर्थक्षेत्र आहे आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीचे लग्न परळीच्या वैद्यनाथ यांच्याशी ठरले होते पण वऱ्हाडी मंडळी पोहोचायला उशीर झाला व त्यामुळे विवाह मुहूर्त टळला परिणामी सर्व वऱ्हाडी मंडळी तेथे जेथे उतरली होती तेथे दहूगडच्या मूर्ती बनले. तिकडे योगेश्वरी परळी पासून दूरच बसून राहिली अशी लोककथा या भागात प्रचलित आहे.
भरपूर पाणी उत्तम हवामान आणि दळणवळणाची भरपूर साधने असल्याने परळी हे गाव व्यापारातही अग्रणी मानले जाते. या ठिकाणी अतिशय मोठे औष्णिक विद्युत केंद्रही कार्यरत आहे. परळीच्या आजूबाजूला अनेक पौराणिक घटना घडलेले आहेत हे गाव छोटे असले तरी अनेक दृष्टीने येथे शहरासारखे महत्त्व प्राप्त बनले आहे. फार पूर्वी देव दानवांनी समुद्रमंथन केले होते त्यावेळी त्यातून 14 रत्न निघाली होती त्यात धन्वंतरी व अमृत या दोघांना भगवान शंकराचे शिवलिंगात लपवून ठेवले होते. असूरांना जेव्हा या लिंगमूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या हे पाहून असुर पळून गेल्यानंतर जेव्हा शिवभक्तांनी त्या शिवलिंगाला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताच्या धारा वाहू लागल्या तेव्हापासून आजही या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची पद्धत आहे.

या ठिकाणी जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद असा कोणताही भेदभाव पाळला जात नाही. कोणीही येथे येऊन सहज दर्शन घेऊ शकतो. या शिवलिंगात अमृत व धन्वंतरीचा निवास असल्यामुळे याला अमृतेश्वर किंवा धन्वंतरी असेही नाव आहे.या परळी गावात आसपासच्या परिसरात व डोंगर भागात नदीकिनारी अनेक उपयुक्त वनौषधी सापडतात त्यामुळे परळीचे हे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ या नावाने ही ओळखले जाते. भगवान श्री विष्णूचे सर्व देवांना या ठिकाणी अमृत विजय मिळवून दिला म्हणून या स्थानाला वैजयंती हे नाव मिळाले.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा परिचय मराठीत | Vadyanath Jyotirlinga Information Marathi Marathi

पुरातन काळात एकदा लंकाधिपती रावण कैलास पर्वतावर जाऊन शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप करू लागला ऊन, पाऊस, थंडी इत्यादी त्रास सोसूनही जेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत तेव्हा रावण आपले एक मस्त कापून शंकराला अर्पण करू लागला अशा प्रकारे त्यांनी आपली 9 मस्तके शिवाला अर्पण केली. जेव्हा तो आपले 10 शीर कापण्या तत्पर झाला तेव्हा साक्षात भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी रावणाची 10 डोकी पूर्ववत केली व रावणाला वर मागण्या सांगितले. रावणाने शिवाला सांगितले की मी आपणास लंकेत घेऊन जाऊ इच्छितो.
भगवान शंकर यांनी रावणाची ही इच्छा मान्य केली ते रावणाला म्हणाले तू माझ्या या आत्मलिंगाला अवश्य लंकेत घेऊन जा पण लक्षात ठेव जात असताना तू चुकून जरी या आत्मलिंगाला वाटत कुठे जमिनीवर ठेवले तर ते शिवलिंग त्या जागी स्थिर होईल. रावण आनंदाने ते शिवलिंग घेऊन लंकेला निघाला वाटेत त्याला लघु शंका लागली पुढे त्याला एक गुराखी भेटला रावणाने त्याला विनंती केली व ते शिवलिंग त्याच्या हातात देऊन रावण लघुशंकेला गेला पण त्या गोराख्याला त्या शिवलिंगाचा भार सहन झाला नाही. त्यामुळे त्याने ते शिवलिंग खाली भूमीवर ठेवून दिले तेथेच स्थिर झाले पुढे चालून त्याचेच नाव वैद्यनाथ ईश्वर पडले.

देवांना जेव्हा कळले की सध्या शिवशंकर रावणा जवळ राहत आहे तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले त्यांनी नारदाला विश्वासात घेतले नारदमुनी रावणाकडे गेले व त्याच्या तपश्चर्याची प्रशंसा करून म्हणाले रावणा तू शंकरावर विश्वास करून फार मोठी चूक केली आणि शिव शंकराचे शब्द खरे मान्य हे फार मोठी चूक आहे आता तू असे कर कैलास पर्वतावर जा आणि त्यांचे नुकसान करून आपली हीच संधी साधून घे यासाठी तू जा कैलास पर्वताला मुळापासून उपटायला सुरुवात कर हेच तू आपल्या ध्येयात सफल झाल्याचे लक्षण असेल रावण नारदमुनि च्या बोलण्याला फसला व त्याने तसेच केले. त्यामुळे रागावलेल्या शिवानी रावणाला शाप दिला, की तुझ्या अहंकाराचा नाश करणारी शक्ती लवकरच अवतरीत होणार आहे ही गोष्ट नारदाने देवाला जाऊन सांगितले त्यामुळे देव हर्षित झाले. इकडे रावण आनंदात घरी आला शिवाच्या मायेने त्याला ग्रासले. त्यामुळे आता सारे जग जिंकण्याच्या आशेने त्याला पछाडले. त्याच्या अहंकाराचे नाश करण्यासाठी विष्णू ने प्रभु श्री रामचंद्रांचा अवतार धारण करावा लागला.

वैद्यनाथ मंदिराचा परिचय मराठीत |Vydaynath Temple Information In Marathi

श्री वैद्यनाथाचे मंदिर गावात उंचावर वसलेले असून मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडात झालेले आहेत. सभोवताली उंच शिखर आणि मजबूत भिंत आहे. मंदिरात प्रवेश करतात समोर ओसरी व अंगण आहे. मंदिराच्या बाहेर उंच दीपस्तंभ आहे. महाद्वाराजवळ एक मिनार आहे त्याला प्राची किंवा गृक्ष म्हणतात. दिशा साधन केल्यामुळे चैत्र आणि अश्विन महिन्यातील काही विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे सरळ शिवलिंगावर पडतात.

वैद्यनाथ मंदिरात जाण्यासाठी मोठ्या आणि मजबूत पायऱ्या आहेत. त्यांना घाट म्हणतात. जुना घाट इ.स 1108 मध्ये बांधला आहे. मंदिरातील गाभारा व सभागृह हे दोन्ही एकाच पातळीवर असल्याने सभा मंडपातूनच भगवान शिवाचे दर्शन होते. अशी रचना बाकीच्या इतर लिंगात कुठेही दिसून येत नाही बाकीच्या सर्व ठिकाणी मुख्य गाभारा हा थोडा खोलवर बनवलेला आहे .श्री वैद्यनाथाची शिवलिंग शालिग्राम सूर्यपासून बनवलेले आहे ते अतिशय सतीश व प्रसन्न दिसते. गाभाऱ्यात चोहीकडे नेहमी नंदादीप तेवत असतात. या मंदिराचा जिर्णोद्धार शके 1706 मध्ये शिवभक्त सती अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. यासाठी परळी पासून जवळच त्रिशूल देवी डोंगरावरून विशिष्ट प्रकारचे दगड मागवण्यात आला होता. अहिल्यादेवींना हे तीर्थस्थान फार आवडत असे. मंदिराचा भव्य सभामंडप स्वर्गीय रामराव नाना देशपांडे यांनी बांधला. त्यासाठी त्यांना स्थानिक कारागीर व नागरिकांनी मदत केली होती, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वैजनाथ मंदिरा जवळ एक रामराजेश्वर महादेवाचे मंदिर बनवले आहेत. वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणातच भगवान शिवशंकराची आणखीन 11 मंदिर आहेत. वीर शेव लिंगायत समाजाचा वैद्यनाथ हे एक श्रेष्ठ तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. श्रीमंत पेशव्यांनी या देवस्थानाच्या व्यवस्थेसाठी मोठी जहागिरी दिली होती .आता एक समिती मंदिराचा सर्व कारभार पाहते त्या ठिकाणी अनेक मंगल कार्य आयोजित केले जातात.

सहलीवर आलेले लोकही येथे राहतात. परळी जसे शिवशक्तीचे एकत्र स्थान आहे तसेच ते हरिहर मिलनाचेही स्थान आहे .या संयुक्त भूमीत भगवान शंकर आणि सोबतच भगवा श्रीकृष्णाचाही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील हरिहर तीर्थाचे पाणी वैद्यनाथच्या दैनंदिन पूजेसाठी उपयोगात आणले जाते. सोमवारी तर येथे भाविकांचा जनसागरच लोटला जात असतो. गुढीपाडवा, विजयादशमी, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीला येते मोठे उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवांमध्ये तू अस्व बेलपत्र यात कसलाही भेदभाव केला जात नाही. महादेवाला तुलसी तर विष्णूला बिल्व अर्पण करण्याची आगळी वेगळी पद्धत येथे आहे. रुद्रभिषेक चालू असतात मंदिरातील वेद मंत्र व रुद्र मंडळाच्या जयघोषाने परळीचा परिसर दुमदुमून जात असतो.

वर्षभर नित्य पूजाही मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने पार पाडले जात असतात फार पूर्वी याच परिक्षेत्री मार्कंडेय याला शुभ कृपेने जीवनदान मिळाले होते. अतिशय कमी वयाचा असताना यमराज्याच्या पाशातून मार्कंडेयाला भगवान शिव शंकरांनी सोडवले होते. त्याच्या स्मृतीनिमित्त मार्कंडेय नावाने येथे एक तळ बनवण्यात आले आहे. त्याप्रमाणे सत्यवान व सती सावित्रीच्या कथेतील पुण्यभूमी हीच आहे. याच कथेतील वटवृक्ष आजही नारायणाच्या डोंगरावर उभा आहे. तसेच वटेश्वर महादेवाचे एक मंदिरही आहे .राजश्री आणि राणी सांगून यांचा मुलगा शिव कृपेने पुन्हा जिवंत झाला. ते स्थान म्हणजे परळी होय. तसेच प्रसिद्ध संत जगमित्र नागा यांचे वास्तव्य परळीलाच होते. आजही त्यांचा आश्रम व समाधी येथे आहे. जगमित्रा यांची जीवनकथा माहिती महिपत बुवा ताराबादकर यांनी पद्यरूपात लिहिली आहे. भक्ती विजय असे या ग्रंथाचे नाव आहे संत नाना विकल भक्त ब्राह्मण होते.

परळी शहरातच भिक्षा मागून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे रात्रंदिवस विकलाचे नामस्मरण करावे हा एकच छंद त्यांना होता एकदा रात्री ते झोपले असता काही समाजकंटकांनी त्यांची झोपडी पेटवून दिली. पण विकलाच्या कृपेने सुरक्षितपणे बाहेर पडले व वाचले नंतर काही गावकऱ्यांनी त्यांना निर्वाहासाठी काही जमीन दिली. त्यातूनच कष्ट करून ते आपला प्रपंच चालवू लागले. संत नागा यांच्या विरोधकांनाही भावले नाही. काही दिवसांनी एक येऊन अधिकारी बदलून आला विरोधकाने त्यांची भेट घेऊन त्यांचे कान भरले त्यामुळे त्याचा गैरसमज होऊन त्यांनी संत जगमित्र नागा यांची जमीन हिसकावून घेतली. जमीन परत देण्यासाठी त्यांनी अट घातली की तू विकला भक्त जगमित्र असेल तर त्यांनी माझ्या व्यक्तिगत पूजा पाठासाठी जिवंत वाघ आणून दाखवावा. ते वनात गेले व तपश्याच्या करू लागले त्या देशभवानांनी वाघाचे रूप घेतले व त्यांना दर्शन दिले नागा यांना फार आनंद झाला वाघारुपी देवाला घेऊन ते अधिकाऱ्यांच्या घरी गेले वाघाला पाहून तो लज्जित झाला. त्याने संत नागा यांची क्षमा मागितली व त्यांनी जमीन त्यांना परत केले. अशा या संतांची समाधी परळी वैद्यनाथात आहे.

याचबरोबर काळा राम मंदिर, गोपीनाथ मंदिर, दत्त ,कालिका ,शनी मंदिर विठ्ठल, बालाजी मंदिर अशी अनेक मंदिरे व आश्रम या शहरात आहे. सोंड नसलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणपतीचे मंदिर येथे आहे. हा गणपती पैलवानासारखे आसन घालून पाय दुमडून बसलेला आहे. बैद्यनाथाच्या दर्शना अगोदर या गणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. वखरे बुवा ,गुंडी राज महाराज, यमराज विश्वेश्वर, गुरुलिंग स्वामी ,आदी अनेक संत व महापुरुषांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही परळीची भूमी महाराष्ट्रात आहे ही एक अभिमानाची बाब आहे. परळी वैज्ञानिक क्षेत्र महाराष्ट्रात असून बीड जिल्ह्यात आहे औरंगाबाद पासून 260 किलोमीटर तसेच साउथ कडून येणाऱ्या निजामबाद मार्गे येता येते. जय वैद्यनाथ! जय वैद्यनाथ !जय वैद्यनाथ !जय शिवशंकर! हर हर महादेव !ओम नमः शिवाय!

Leave a Comment