श्री रामेश्वर मंदिर मराठी माहिती |Shri Rameshwar Temple Information In marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्रीराम यांनी स्थापन केलेल्या रामेश्वर मंदिराच्या इतिहास व पार्श्वभूमी बघणार आहोत हे देखील एक ज्योतिर्लिंग आहे.

काशीच्या गंगेचे त्रिवेणी संगमाचे पाणी रामेश्वराला नेऊन अर्पण करावे ही चारीधाम सर्वात मोठी पुण्याची गोष्ट मानली गेली आहे. काशीला बिंदू माधव मंदिरा जवळ गंगा स्नान करून तेथून गंगेचे पवित्र पाणी रामेश्वरला अर्पण करतात. आणि रामेश्वराच्या धनुष्यकोटी सेतू माधवाजवळ समुद्रस्नान करून तेथील पवित्र वाळू प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथील वेणी माधव मंदिराजवळ त्रिवेणी संगमात अर्पण केली जाते. तेथून विधीपूर्वक त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणले जाते त्यानंतर चारही धामाची यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते. चारीधामांची यात्रांमध्ये रामेश्वर याचा समावेश होतो
भारताच्या दक्षिणेकडे दक्षिण पूर्व कोपऱ्यात रामेश्वर हे समुद्र तीर्थ आहे. चारीधाम याचे हे क्षेत्र ज्योतिर्लिंग रूपात पवित्र स्थान आहे स्कंदपुराण, शिवपुराण वगैरे अनेक ग्रंथांमध्ये या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. श्री रामेश्वराची कथा अशी

रामेश्वर मंदिराची कथा मराठीत   |Rameshwar Temple Story In Marathi


सीतेच्या शोधात फिरत असताना श्रीरामाची सुग्रीवाशी मैत्री झाली त्याच्या विशेष दूत असलेल्या राम भक्त हनुमानाने सीतेचा ठाव ठिकाणी शोधून काढला. त्यानंतर रावणावर आक्रमण करण्यासाठी श्री रामचंद्र यांनी वानर सेना सज्ज केली व दक्षिणेच्या सागर तीरावर पोहोचले.
तेथे आल्यावर समुद्र कसा पार करायचा त्याची चिंता त्यांना पडली. शिवभक्त असलेल्या श्रीरामाला चिंता करताना पाहून लक्ष्मण व सुग्रीव वगैरेंनी त्यांना समजावून पाहिले. पण भगवान शंकराकडून बल प्राप्त झालेल्या रावणाच्या बाबतीत ते साशंकच होते .अशातच प्रभू राम त्यांना तहान लागली व त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पीत असतानाच अचानक त्यांना शिव पूजेची आठवण झाली. तेथेच त्यांनी पार्थिव लिंग स्थापन केले व त्याची सर्व मंत्रोच्चारांनी पूजा केली त्यानंतर श्रीरामचंद आणि अतिशय अर्थ स्वरात जय जय कार, नृत्य व कंठणाद करू लागले.( कंठणाद म्हणजे तोंडातून बम बम असा डमरू सारखा आवाज काढणे)

शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी श्रीरामाला वर मागण्या सांगितले. श्री रामाने प्रकट भगवान शंकरांचे विधीपूर्वक पूजन केले आणि म्हणाले हे प्रभू जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न होऊन एकमस्तू असा वर दिला व शिवलिंग रूपात प्रकट होऊन रामेश्वर हे नाम धारण केले व जगप्रसिद्ध झाले. महादेव रामेश्वराच्या कृपेनेच रावण व इतर अशुरांना मारून श्री रामचंद्र विजयी झाले. या दिव्य शिवलिंगाचे दर्शन करतात व पवित्र गंगोटक अर्पण करून शिवपूजन करतात. तो जीवन मुक्त होऊन मोक्षाला जातो. रामेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे तेथे आता अतिशय सुंदर व भव्य असे मंदिर बनवले असून तो वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

रामेश्वर मंदिराचा परिचय मराठीत | Rameshwar Temple Information In marathi

तमिळनाडू राज्यातील रामनाड जिल्ह्यात वाळूच्या एका मोठ्या बेटावर हे सुंदर व दिव्य साक्षात्कारी मंदिर उभे आहे. रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर दहा मजले उंच असे भव्य गोपूर आहे त्याचे बांधकाम त्यावरील नक्षी व कोरीव काम पाहून भाविक दंग होतात. येथे येऊन देवाच्या विराट स्वरूपाची कल्पना येते भक्तांचे संकुचित मन येथे येऊन आपोआपच विशाल बनते. मंदिराच्या उंच दगडी खांबांवर अतिशय सुंदर चित्र काढलेली आहेत. सोंड वर केलेल्या हत्तीची अनेक शिल्पे आहेत.

मंदिराच्या सर्व बाजूंनी दगडांची मजबूत संरक्षक भिंत बांधलेली आहे या भिंतीची रुंदी 650 फूट तर उंची १२५ फूट आहे. वाळूच्या बेटावर बनवलेल्या या भव्य मंदिराची काम कारागिरी पाहून भक्तगण प्रभावित होतात. येथेच एक सुवर्ण मंडित खांबाजवळ 13 फुट उंच व 9 फूट रुंद असलेला अखंड श्वेत कोरलेला भव्यनंदी आहे हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे .श्री रामेश्वराच्या मुख्य द्वाराजवळच पार्वती मातेचे मंदिर आहे.

याशिवाय संतान गणपती, वीरभद्र हनुमान, नवग्रह आणि मन देवी इत्यादी अनेक मंदिर या बेटावर आहेत. मुख्य मंदिरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर गंधमाधन पर्वत टेकडी आहे येथे पूर्वी कोणीतरी किल्ला बांधला होता. रामदरी, राम झरोका ,बिभीषणाचे मंदिर इत्यादी स्थळे प्रेक्षणीय आहेत. रेताड प्रदेश असूनही येथे बाग बगीचे व उद्याने चित्त वेधक आहेत. रामेश्वराचे हे नंदनवनच आहे.

या रामेश्वर बेटावर रामतीर्थ, सीता कुंड, जटा तीर्थ ,लक्ष्मण तीर्थ, कपि तीर्थ, ब्रह्मकुंड ,विपुलनीती तीर्थ ,गालावती तीर्थ, मंगल तीर्थ ,पावन तीर्थ असे 25 तीर्थ आहेत या सर्व तीर्थांचे पाणी अतिशय मधुर असून त्या पाण्याला एक वेगळाच स्वाद आहे वेगळीच चव आहे प्रत्येक तीर्थाची वेगवेगळी कथा आहे .या सर्व तीर्थात भक्त भाविक स्नान करून आपले तन आणि मन निर्मळ बनवतात.
श्री रामेश्वर मंदिराचे सर्व व्यवस्था भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे. मंदिराचे देखरेख फारच व्यवस्थित रित्या ठेवली जाते या क्षेत्रात भिक्षा मागणी भिक्षा देणे निशिद्ध आहे. येथील सर्व कर्मचारी शासकीय नोकर आहेत येथील मुक्त शिस्त पाहून भक्तगण प्रभावित होतात. श्री रामेश्वरच्या पूजा विधीचे व दानधर्माचे दर ठरवून दिलेले आहेत. प्रारंभी कार्यालयात पैसे भरवल्यास पावती दिली जाते तो पावती पूजेच्या साहित्यासोबतच ताटात ठेवून पुजाऱ्याकडे दिले जाते पूजेचा विधी लांबूनच पाहता येतो. व पूजेच्या नंतर प्रसाद दिला जातो.

चांदीच्या पत्रांनी मिळवलेल्या उच्चासनावर पांढऱ्या हिऱ्यांनी बनलेले श्री रामेश्वर असे दिव्य असे शिवलिंग आहे. या शिवलिंगावर शेषनागाच्या फनीचे सोन्याचे छत्र आहे ,याच लिंगमूर्तीवर गंगोदक व बेलपत्र वाहतात. श्री रामेश्वरच्या दर्शनाने भावीक कृतार्थ होतात प्रदोष शिवरात्री इत्यादी परवनीच्या वेळी श्री रामेश्वर ची पालखी हत्तीच्या पाठीवर ठेवून तिची मिरवणूक काढली जाते. मंगळवार व शुक्रवारी पार्वती मातेचे तीन फूट उंचीच्या मृत्यूची पालखी निघते.

उत्सव मूर्तीला वस्त्र व आभूषांनी सजवले जाते सर्वोत्सव मंदिरात हजारो दिवे लावून आरास केली जाते. हे दृश्य अतिशय मनमोहक असते रोज पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मंदिरात भक्तांचे दर्शनासाठी येणे चालूच असते. दिवसभराच्या पूजा वगैरे विधीनंतर रात्रीची आरती होते. त्यानंतर देवाच्या शयनगृहात सोन्याच्या झोपाळ्यावर शंकर पार्वतीच्या भोग मूर्ती ठेवल्या जातात. येथे महाशिवरात्री आणि आषाढ महिन्यातील पंधरा दिवस बडतरा मेला नावाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळ व संपूर्ण भारतभरातून भक्तगण रामेश्वरला येतात व दर्शन घेऊन धन्य होतात विविध वेष भाषा व प्रांताचे लोक येथे येतात त्यामुळे भारतातल्या एकात्मतेचे मनोहरी दर्शन येथे घडते जय श्री रामेश्वर जय श्री राम रामेश्वर हर हर महादेव ओम नमः शिवाय

दरवर्षी रामेश्वरम मंदिराला भेट देण्यासाठी अनेक भक्त येथे रांगा लावतात. रामेश्वरम दर्शनासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोंबर ते एप्रिल यादरम्यानचा काळा चांगला असतो. जुलै ते ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये पाऊस असला, तरी या काळात हे दृश्य अतिशय संस्मरणीय आहे. भारताच्या धार्मिक स्थळांमध्ये चार पवित्र तीर्थक्षेत्र यांचा समूह म्हणजे चारधाम होय. चारधाम संकल्पनेमध्ये भारताच्या चार दिशेतील अतिशय महत्त्वपूर्ण मंदिरांचा समावेश होतो. चारधाम यात्रा यामध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी आणि भगवान शिवाचे रामेश्वरम या प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. रामेश्वरम हे मंदिर भगवान शिव शंकर भोलेनाथ यांना समर्पित केले आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला इथे भक्तांचा महापूर येतो. कारण महाशिवरात्री ही शिवभक्तांची पर्वणीस ठरते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी या मंदिराला भेट देतात. रामेश्वर आम्ही या मंदिराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे भगवान शिव यांची दोन शिवलिंगे आहेत. तसेच देवी पार्वती यांचे देखील दोन मुर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या आहेत. देवी पार्वती यांची एक मूर्ती पर्वत वर्धिनी म्हणून ओळखली जाते ,तर दुसरी विशालक्षी म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या पूर्व द्वारा बाहेर हनुमानजी यांची विशाल मूर्ती वेगवेगळे मंदिरात स्थापन केली आहे
जय हनुमान
हर हर भोले
ओम नमः शिवाय
जय भोलेनाथ…

Leave a Comment