श्री महाकालेश्वर मंदिर मराठी माहिती | Shri  Mahakaleshwar Temple Information In marathi

नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण राजा राम मोहन राय मराठी माहिती श्री महाकालेश्वर मंदिर मराठी माहिती Shri Mahakaleshwar Temple Information In Marathi या विषयावर माहिती घेणार आहोत.

बऱ्याच वेळा गावासाठी मंदिर असते, तर कधी मंदिरासाठी गाव असते पण मंदिराचेच गाव असावे हा प्रकार फार कमी वेळा ऐकण्यात येतो.असंच एक मंदिरांचं गाव म्हणून ओळखलं जाणार भगवान महाकालेश्वर यांचं उज्जैन हे तीर्थक्षेत्र. उज्जैन हे शहर मध्यप्रदेशात शिप्रा नदीच्या तीरावर वसले आहे. या नगराला इंद्रपुरी, अमरावती किंवा अवंतिकाही म्हटले जाते. उज्जैन या नगरीतील शेकडो मंदिराची सुवर्णमंडित शिखरे पाहून या नगरीला सुवर्णशृंग असेही म्हणतात. मोक्षदायक असलेल्या सप्त पुरांपैकी एक असलेला या अवंतिका म्हणजेच उज्जैन नगरीत 7 सागर तीर्थ ,28 तीर्थ, 84 सिद्धलिंगे , 25 -30 शिवलिंगे, अष्टभैरव तसेच एकादश रुद्रस्थाने, विविध देवी-देवतांची शेकडो मंदिरे ,जलकुंभ व स्मारक आहेत. हे पाहून असे वाटते की जणू 33 कोटी देव इंद्रपुरी उज्जैन नगरीत अवतरली आहे.या ठिकाणी गेल्यावर इथून परत येण्याचे मनच होत नाही

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मराठीत माहिती | Mahakaleshwar Jyotirlinga Information In Marathi

उज्जैन येथे महाकालेश्वर यांची पहाटे चार वाजता अभिषेक व पूजा होते. त्यानंतर त्यांना विधी पूर्वक चिता भस्म अर्पण केले जाते. शास्त्रात भस्म अशुभ, अशुद्ध आणि अपवित्र मानले गेले आहेत, चिता भस्माचा स्पर्श जरी झाला तरी स्नान करावे असे शास्त्रात म्हटले आहे पण हे चिता भस्म महाकाल शिवाच्या स्पर्शाने पवित्र होते कारण शिव निष्काम आहेत. त्यांना काम विकास स्पर्श करू शकत नाही. म्हणून भगवान शिव शंकर मंगलमय आहेत हे शिवमहिमा या स्रोतात वर्णन आहे.

अशाप्रकारे भगवान शिव पवित्र व मंगलमय आहे. अवंती नगरी शिवाची प्रिय नगरी आहे जे भाविक महाकालचे दर्शन करतात त्यांना स्वप्नातही दुःख भोगावे लागत नाही. भाविक या महाकालची उपासना करतात ती त्यांची इच्छा पूर्ण होऊन त्यांचे मनोगत सिद्ध होतात व भाविकांना मोक्षाची प्राप्ती होते येथील शिवलिंग अतिशय मनमोहक आहे. येथे भगवान शिवाचे दर्शन केल्याने सर्व पापे नष्ट होतात.

ओंकारेश्वर शिवलिंगाची कथा मराठी | Omkareshwar shivling Information In marathi

अवंती नगरीत राहणाऱ्या एका ब्राह्मणाला 4 शिवभक्त मुले होती. याच दरम्यान दूषण नावाच्या राक्षस राजाने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला व नंतर अवंती नगरीत येऊन त्याने येथील ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. पण शिवभक्त ब्राह्मण थोडेही विचलित न होत शांत राहिले हे पाहून दैत्य राजाने आपल्या सर्व सैनिकांना आदेश दिला की या अवंती नगरीला चहूबाजूंनी घेरून येथे होणारे वैदिक अनुष्ठान बंद पाडा.

राक्षसांनी दिलेल्या त्रासामुळे दुःखी जनता ब्राह्मणाकडे आली, ब्राह्मणांनी त्यांना धैर्य धारणा करण्याचे सांगितले व ते स्वतः भगवान शिवाच्या आराधने साठी तत्पर झाले. ब्राह्मणांनी संकट निवारण करण्यासाठी भगवान शंकराच्या धावा सुरू केला. त्याचवेळी राक्षस राजाने आदेश देत आपल्या सैन्या समवेत त्या ब्राह्मणांवर हल्ला केला. त्यांनी हल्ला करतात पूजेतील पार्थिव मूर्तीच्या जागी अतिशय घनघोर आवाज होऊन जमीन दुभंगली व त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला या खड्ड्यातून विक्राहरूप धारण केलेले महाकाल भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी दुष्यंत त्याला ब्राह्मणांचा जवळ न येण्याबद्दल ताकीद दिली. पण त्या उन्नत असुराने त्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही परिणामचा आज्ञेचा भंग करणाऱ्या भूषण राक्षसाला महाकाल रुपी शंकराने भस्म करून टाकले. त्याच्या या रूपाची ब्रह्मा देव, विष्णू भगवान, इंद्रदेव ,वरून देव अशा वेगवेगळ्या देवांनी स्तुती केली. महाकालेश्वर चा महिमा आघात आहे. जय भोलेनाथ हर हर महादेव ओम नमः शिवाय

महाकालेश्वर कथा मराठीत | Mahakaleshwar Story In Marathi

उज्जैन नगरी चा राजा चंद्रसेन मोठा शिवभक्त होता. तसेच तो शास्त्रांचा जाणकार होता. चंद्रसेन राजाचा मित्र असलेल्या मनीभद्र नावाच्या शिवगणाने त्याला एक सुंदर चिंतामणी रत्न दिले होते. या रत्नाला चंद्रसेनाने धारण केले तर तो इतका सुंदर दिसायचा की स्वर्गातील देवांनाही त्याचा हेवा वाटेल. काही नगरांच्या राजांनी राजा चंद्रसेना जवळ या रत्नाची मागणी केली पण त्यांना चंद्रसेनने नकार दिला. त्यामुळे चिडून त्यांनी राजा चंद्रसेन वर आक्रमक केले. आपण चहू बाजूने घेरले गेलो हे पाहून चंद्रसेन महाकाल श्री शंकराला शरण आला. महाकालेश्वर भगवान शिवशंकर ने प्रसन्न होऊन त्याला अभय दिले. योगायोग असा की एक ब्राह्मण महिला फिरत महाकाल शिवाजवळ आली. तिच्यासोबत तिथे लहान बालकही होते. त्या लहान बालकाने मंदिरात गेल्यावर राजा चंद्रसेनला शिवपूजन करताना पाहिले त्यामुळे त्याच्याही मनात भक्तीभाव जागृत झाला.

त्या लहान बालकाने आपल्या राहत्या घरी एक सुंदर दगडाची स्थापना केली व त्यालाच शिवरूप मानून तो त्याचीच नित्यनेमाने रोज पूजा करू लागला. या पूजेत त्याला भूक तहान लागत नसे इतका तो तल्लीन होईल एकदा त्याची आई त्याला बोलवण्यास गेली पण मुलगा तसाच निश्चल बसून राहिला. त्यामुळे त्या मातेने त्याचे दगडाचे शिवलिंग दूर फेकून दिले व त्याची पूजा सामग्रीही नष्ट केली, आईच्या या कृत्याने तो मुलगा दुःखी झाला. व भक्ती भावाने भगवान शिवशंकराचे स्मरण करू लागला. त्याच्या या भावनेने शंकर भगवान प्रसन्न झाले व गोपी पुत्राकडून पुजला गेलेला दगड रत्नजडित ज्योतिर्लिंगाचे रूपाने अभिवृत्त झाले. भगवान शंकराची पूजा व स्तुती करून तेव्हा त्याला आपल्या झोपडीच्या जागी मोठा महल उभा झालेला दिसला. अशा प्रकारच्या कृपेने तो मुलगा धनधान्याने समृद्ध होऊन सुखी जीवन व्यतीत करू लागला. इकडे शत्रू राजाने जेव्हा चंद्रसेन राजावर आक्रमक केले. तेव्हा त्यांनी आपसात बोलताना विचार केला की चंद्रसेन राजा हा शिवभक्त आहे आणि उज्जैन ही भगवान महाकाल यांची नगरी आहे त्यामुळे इथे आपले काहीही चालणार नाही असे समजून त्यांनी राजा चंद्रसेनाशी मैत्री केली.

सर्वांनी मिळून भगवान शिवशंकर महाकाल ची पूजा केली याच वेळी त्या ठिकाणी रामभक्त श्री हनुमान प्रकट झाले. त्यांनी उपस्थित राज्यांना गोपी पुत्राचे उदाहरण देऊन सांगितले की भगवान महाकालचे पूजन असे असते की मनुष्यप्राण्याला मुक्ती देऊ शकते. फक्त भगवान शिव शंकर भोलेनाथ हे असे आहेत की जे मंत्रोच्चार बिना केलेले पूजेने व तांब्याभर पाण्याने ही प्रसन्न होतात. पवनपुत्र वीर हनुमान यांनी चंद्रसेन राजाकडे स्नेहपूर्ण व कृपेचा एक कटाक्ष टाकला आणि त्याला आशीर्वाद देऊन ते अदृश्य पावले. उज्जैन नगरी ही संस्कृत विद्येचे आद्यपीठ आहे. धर्म, ज्ञान आणि कलेचा त्रिवेणी संगम येथे झालेला आहे. मौर्य गुप्त व अन्य राजांनीही या नदीच्या वैभवात भर टाकली. संमत करता राजा विक्रम आदित्य याची तर उज्जैन नगरी राजधानीच होती. या ठिकाणांच्या कथेत राज्य मूर्त हरीचे विरहरीची विरहकथा नीती शतक ची राजकन्या व वास्तवता आणि उदयन यांची प्रेमकथा उज्जनगरीचे नैसर्गिक सृष्टी सौंदर्य यावर अनेक लेखकांनी विपुल साहित्य लेखन केले आहे. महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे अतिशय प्रिय व पवित्र स्थान मानले जाते युवान शिवाय फक्त एक कामगार पाणी आणि एक बेलपत्र चढवले तरी तो तरीही तो प्रसन्न होतो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहेमहाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असून उज्जैन नगरीत आहे भगवान शिवाजी अतिशय प्रिय आहे .जय भोलेनाथ संपूर्ण उज्जैन नगरी श्रावण सोमवारी जय शिवशंकर जय शिवशंकर जय भोलेनाथ हर हर महादेव अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो जातो.

जय भोलेनाथ … हर हर महादेव … ॐ नमः शिवाय

Leave a Comment