भीमा झाली चंद्रभागा
विठ्ठल चरणी ची गंगा
चंद्रभागा म्हणजे भीमा नदीच्या तीरावर पंढरपुरातले लाखोभावीक तल्लीन होऊन नाचताना दिसतात पंढरपुरात नेहमीच दिसणारे हे दृश्य असते. पंढरपूर जवळ भीमा नदी चंद्रकोर सारखे आकार घेऊन वाहते म्हणून तिला तिथे चंद्रभागा म्हणतात. लाखो वारकरी तिला गंगा भगीरथी म्हणून त्यात स्नान करतात. गंगेचा उगम भगवान शंकराच्या जटेत झाला व ती स्वर्गातून सरळ धरतीवर प्रकटली तर भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झाली. श्री क्षेत्र भीमाशंकर आहे. अतिशय उंचावर असूनही तेथील हवा बोचरी नाही येथील वातावरण फारच अल्हाददायक आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुका घोडेगाव च्या पुढे सह्याद्री पर्वत त्याची भंवर गिरी, रथाचल आणि भीमाशंकर हे तीन शिखरे आहेत.
त्यातील भीमाशंकरच्या डोंगरावर हे पवित्रा तीर्थक्षेत्र आहे. अतिशय उंचावर असूनही येथील हवा बोचरी नाही. येथील वातावरण फारच अल्लाददायक आहे येथील निबिड अरण्यात कधी मधी वाघ ही दृष्टीस पडतात. या जंगलात अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात आहेत. तसेच अन्य प्राणी ही पहावयास मिळतात.
तीर्थस्थानाला पोहोचण्यासाठी मजबूत व प्रशस्त रस्ते बनवण्यात आले आहेत. त्यामुळे येथे पोहोचण्यात तितके अवघड राहिलेले नाही. फक्त कोकणातून येथे येताना डोंगर मार्ग असल्याने फक्त थोडासा त्रास होतो. फार पूर्वी येथे राक्षसांचा निवास होता. या भागात लोक वस्ती नाही फक्त महाशिवरात्रीच्या परवावर भाविकांची गर्दी वाढल्यानेच हा परिसर चमचमतांना दिसतो. इतर वेळा भाविक येतात व दर्शन पूजन करून निघून जातात. आता तर गेल्या काही दिवसात येथे बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे शासनाचे एक विश्रामगृह देखील येथे आहे. जंगलातील वाघ सिंह रोज रात्री या भीमा शंकराचे दर्शन घेऊन जातात अशी एक आख्यायिका आहे येथे ज्योतिर्लिंगा संबंधी इतर कथा अशा.
भीमाशंकर मंदिराची कथा मराठीत Bhimashankar Temple Story In Marathi
कथा अशी आहे की प्राचीन काळी त्रिपुरासुर नावाचा राक्षस फार उन्नत झाला होता. तिन्ही लोकांना त्याने त्रस्त करून सोडले होते. त्याच्या या कारवायांनी सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते शेवटी स्वतः महादेव त्रिपुराचा वध करण्यासाठी निघाले भगवान शंकरांनी विशाल रूप धारण केले त्यांचे ते रौद्ररूप बघून त्रिपुरा श्री भयभीत झाला दोघांत अनेक दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी शंकर भगवान यांनी त्रिपुरासराचा वध केला. त्याच्या वधाने स्वर्ग, मृत्यू आणि पातळ या तिन्ही लोकांचे संकट टळले. त्यावेळी भिम काय रूप घेतलेल्या भगवान शंकरांना थकल्यासारखे वाटले थोडी विश्रांती घेण्यासाठी म्हणून ते सह्याद्री पर्वताच्या एका उंच जागी बसले. अति श्रमामुळे त्यांच्या शरीरातून जो घाम निघाला त्याचा सहस्र धारा झाल्या. त्यापैकी एक धार जाऊन जवळच्या एका तळ्यात जमा झाली तेथून नदीचा उगम झाला तिला भिमा असे नाव मिळाले.
आजही भीमाची उगमस्थान पहावयास मिळते. भक्तांनी नंतर रुद्र रुपी शिवाची प्रार्थना केली व संत सज्जनांच्या रक्षणासाठी आपण येथे निवास करावा अशी विनंती केली. भगवान शंकर यांनी विनंती मान्य केली व ज्योतिर्लिंग रूपाने तेथेच राहिले.
रावणाचा भाऊ कुंभकर्ण कळकटी पासून उत्पन्न झालेले एक अत्यंत वीर राक्षस होता. हा भीम नावाचा असुर धर्माचा नाश करणारा व प्राणीमात्रांना त्रास देणार होता. जे एक जेव्हा त्यांनी आपली आईला स्वतःच्या तिच्याबद्दल व निवासस्थानाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की लंकापती रावण यांचे भाऊ असलेले कुंभकर्ण हे तुझे वडील होते. त्यांना श्रीरामाने मारून टाकले मी आज पर्यंत लंका पाहिलेली नाही. माझी व तुझ्या वडिलांची माझी भेट या पर्वतावरच झाली होती, त्याच्यापासूनच तुझा जन्म झाला. तेव्हापासून मी याच पर्वतावर राहते आहे पती निधनानंतर माहेर हेच फक्त माझेच आश्रयस्थान राहिले आहे. माझी आई पुस्कशी व वडील करकट हे जेव्हा अगस्ती ऋषींच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने माझ्या आई-वडिलांना भस्म करून टाकले. आपल्या आईकडून हे सर्व ऐकल्यावर हा भीमासूर श्रीहरी विष्णू व इतर देवांचा प्रतिशोध घेण्यास तत्पर झाला. त्याने कठोर तप केले, व ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले अपार बलशाली होण्याचा वर प्राप्त केला. त्या वरदानाच्या बळावर त्याने इंद्र विष्णुसह सर्व देवांना जिंकून आपल्या अधीन करून घेतले.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा परिचय मराठीत |Bhimashankar Jyotirlinga. Information In Marathi
त्यानंतर त्यांनी महान शिवभक्त काम रुपेश्वर याचे सर्वस्वहरण करून त्यांना तुरुंगात टाकले बंदी शाळेतही महामरूपेश्वर नियमित विधीपूर्वक शिवपुजन करायचे त्यांची पत्नी ही नियमित शिवराधना करत राहिली. इकडे इतर देवांना सोबत घेऊन ब्रह्मदेव व विष्णू यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. व त्यांच्या भीमा सुराच्या संकटापासून मुक्त करण्याची विनंती केली. शंकराने त्यांना अभय दिले. इकडे भीम राक्षसाला कोणीतरी सांगितले की काम रुपेशवर तुझा संहार करण्यासाठी मोठे अनुष्ठान करत आहे. हे एकूण भीम कारागृहात गेला व त्याने राजा काम रुपेश्वरला त्याच्या पूजा अनुष्ठान बद्दल विचारले राजाने सर्व खरे सांगितले यावर त्यांनी राजा कामरुपेश्वरला सांगितले की तू शंकर ऐवजी माझी पूजन कर राजाने त्याला नकार दिला.
यावर भीमसुराने चिडून जाऊन येथील पार्थिव शिवलिंगावर तलवारीचा प्रहार केला पण त्यापूर्वीच तेथे शिवशंकर प्रकट झाले नंतर त्या दोघात धनुष्यबाण, तलवार,त्रिशूल आदीने घनघोर युद्ध झाले. शेवटी तेथे आलेले नारद मुनिंच्या
विनंतीवरून शंकराने हुंकाराने या भीमाशूर राक्षसाला भस्म केलं अशा तऱ्हेने देव कष्ट मुक्त झाले सर्व देवांनी व ऋषीमुनींनी मिळून शिवाला विनंती केली की आपण या ठिकाणी निवास करावा त्यांच्या विनंतीला मान देऊन लोककल्याण अर्थ महादेवाने भीमाशंकर नावाने येथे निवास केला, व ज्योतिर्लिंग रूप धारण केले स्वयंभू महादेवाचे हे निवासस्थान रथाच्या आकाराच्या डोंगरात आहे या डोंगराला रथचलम असे म्हणतात. पूर्वी या भागात भतीराव नावाचा लाकूडतोड्या राहत असे एकदा लाकडे आणण्यासाठी तो वनात गेला एका वृक्षाच्या बुद्ध्यावर जशी त्यांनी कुऱ्हाड मारली तोच खालील जमिनीवर रक्ताच्या धारा उडाल्या हे पाहून भतीराम घाबरून दूर पळाला काही वेळाने अनेक लोक तिथे जमा झाले कोणीतरी एक दुभती गाय तिथे आणून उभी केली तिच्या आचळातून निघणाऱ्या दुधाचे धारेमुळे रक्ताच्या धारा निघणे बंद झाले. नंतर अतिशय आश्चर्यकारक प्रकटले.भाविकांनी तेथे एक मंदिर बांधून त्या ज्योतिर्लिंगाची मंदिरात प्रतिष्ठा केली याच मंदिराला कालांतराने भीमाशंकर नावाने ओळखले .शिवलीलामृत ,गुरुचरित्र ,स्त्रोत ,रत्नाकर इत्यादी धार्मिक ग्रंथांतून भीमा शंकराच्या
महिमेचे वर्णन केलेले आहे. तसेच गंगाधर पंडित, समर्थ रामदास, श्रीधर स्वामी ,नरहरी, मालो, संत ज्ञानेश्वर ,आधी संतांनी ही श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महात्मे वर्णन केलेले आहे.
भीमाशंकर मंदिराचा परिचय मराठीत Bhimashankar Temple Information In Marathi
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराजही येथे दर्शनाला येऊन गेल्याचा ऐतिहासिक उल्लेख सापडतो तसेच पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि रघुनाथ यांचे आवडीचे ठिकाण असल्याचा आणि रघुनाथराव पेशवे यांनी एक विहीर येथे घडल्याचा ऐतिहासिक दाखला मिळतो श्रीमंत पेशव्यांचे दिवाणजी नाना फडणवीस यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धार केला.
पुण्याचे सावकार चिमणाजी अंताजी भिडे यांनी इ.स 1437 मध्ये या मंदिराचा सभामंडप बांधून काढला. श्री भीमा शंकराचे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधले असून संपूर्ण मंदिराला दशावताराच्या मूर्तीने सजविले आहे. अतिशय कोरीव कामाने मंदिर नटलेले आहे. मुख्य मंदिराजवळ नंदीचे मंदिर आहे जवळच एक प्रचंड घंटा बांधलेली असून तिचे वजन पाच मन आहे. या घंटेवर 1721 असे कोरलेले आहे. हिच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दररोज रुद्रमाहिती, रुद्र स्रोतांद्वारे व दह्या दुधाने श्री भीमा शंकराचा अभिषेक होतो. पूजेचे सर्व साहित्य अतिशय उंची व महाग व मोलाचे असते येथील निसर्ग सौंदर्य अतिशय सुंदर व नेत्र सुखद आहे.
श्री भीमाशंकर मंदिराच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत व त्यांच्याशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कथा ऐकावयास मिळतात या स्थळांमध्ये मोक्ष कुंड, ज्ञानकुंड, गुपत भिमेश्वर, सर्व तीर्थ, पापनाशिनी ,व्याघ्रपाद, तीर्थ साक्षी विनायक, गोरक्षनाथांच्या आरंभ, दैत्यसंहरण्याची कमलजा देवीचे स्थान, हनुमान तळ इत्यादी जागा प्रेक्षणीय आहेत. येथील कोकण किनारा भागातील नागफण्यांचा कडा अतिशय भयंकर आहे. जवळपास 3000 फूट उंच असलेले या ठिकाणाहून पायथ्याच्या कोकणचा परिसर स्पष्ट दिसतो. येथून ते दृश्य पाहताना आपण विमानातून ते पाहत असल्याचा भास होतो. कोकणकडा येथून हे दृश्य उभ्याने पाहता येणे अशक्य आहे त्यासाठी जमिनीवर आडवे झोपूनच ते पाहता येते व झोपलेल्या माणसाचे ही पाय धरून ठेवावे लागतात निसर्गाचा हा भयानक पण नयन रम्य चमत्कार दृश्य रुपात पाहतानाही जय भीमाशंकर! जय भीमाशंकर !असा जयघोष करावा लागतो. जय शिवशंकर! हर हर महादेव! ओम नमः शिवाय!