श्री नागनाथ मंदिर मराठी माहिती |Shri Nagnath Temple Information In marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्री नागनाथ नागेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती घेणार आहोत याची पौराणिक कथा मंदिराचे स्थान व तेथील पर्यंत पर्यटन स्थळे याबद्दल माहिती घेणार आहोत ती खालील प्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असे म्हणतातदक्ष प्रजापतीने महायज्ञाच्या वेळी श्री शंकर भगवान ला निमंत्रण पाठवले नाही पार्वतीला हा अपमान सहन झाला नाही तिने या कुंडात उडी घेऊन आत्म आहुती दिली.
ही बातमी ऐकून श्री शंकराला अतिशय दुःख झाले सतीच्या विरहात ते रानावनात भटकू लागले फिरत फिरत ते अमरदक नावाच्या एका विशाल किनाऱ्यावर येऊन तेथे राहू लागले. या ठिकाणीही त्यांच्या बाबतीत काही अपमानास्पद प्रकार घडले. याचा परिणाम असा झाला की विरक्त झालेल्या भगवान शंकरांनी आपले स्वतःचे शरीर भस्म करून टाकले. बऱ्याच कालावधीनंतर एकदा वनवासात आलेले 5 पांडव या भागात आले व त्यांनी अमरदक सरोवरच्या परिसरात आपला आश्रम बनवला.त्या पांडवांच्या गाई या सरोवराचे पाणी पिण्यासाठी येत असत पाणी पिल्यानंतर यावेळी आपल्या आचळातून दुधाच्या धारा सोडून सरोवाला अर्पण करायचे हा चमत्कार एक दिवशी भिमाने पाहिला त्यांनी ही गोष्ट राजा व त्याचे मोठे बंधू युधिष्ठिरला सांगितली. त्यावर युधिष्ठिर म्हणाला इथे कोणत्यातरी दिव्य देवतांचा निवास असावा.

सर्व पांडवांनी मिळून अमरदक सरोवराचे पाणी उपसणे सुरू केले. सर्वोच्च मध्य भागात पाणी इतकी गरम होते की ते अक्षरशः उकळत होते. नंतर गदाधारी भीमाने आपल्या गदेणे त्या सरोवरातील पाण्यावर तीन वेळा प्रहार केला. त्या अघातानेच पाणी निघून गेले,पण त्याचवेळी सरोवरतून रक्ताच्या धारावाहू लागल्या. तसेच सरोवरचे तळाला भगवान श्री शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग दृष्टीस पडले.
16 योजने लांबी एका वनात दारू व दारूका राहत असत. पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर हे जंगल होते. दारूकाच्या कारवायांनी त्रस्त झालेले ऋषिमुनी व अन्य नागरीक मिळून बोरवे ऋषींना शरण गेले. या ऋषींना देतांचा संपूर्णतः नाश होण्याचा शाप दिला. देवांनी जेव्हा यांच्यावर आक्रमण केले तेव्हा सगळे राक्षस चिंतावंत झाले. त्यावेळी पार्वती कडून मिळालेल्या शक्तीच्या बळावर दारूराक्षस ते सगळं जंगल उचलून आकाश मार्गे समुद्राच्या मध्यभागी नेलं तेथे सर्व राक्षसगण निश्चित होऊन राहू लागले. या वनातील राक्षस ऋषीमुनींना पकडून आणू लागले असेच एकदा त्यांनी अनेक जणांना बंदी बनवले त्यात सुप्रिया नावाचा एक शिवभक्त व्यापारी होता त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिव पूजा केल्याशिवाय तो अन्न जल ही घेत नसे बंदी गृहात टाकल्यावरही त्यांनी आपले शिव आराधना सोडली नाही.
ही गोष्ट तुरुंगाच्या रखवालदारांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिली,तेव्हा त्याने सुप्रियाची हत्या करण्याचे आदेश आपल्या सेवकांना दिले. यावर सुप्रियाने भगवान शिव शंकराचा धावा सुरू केला त्यावेळी साक्षात प्रकट होऊन श्री शंकर भगवानने क्षणभरातच सर्व अशुरांचा समूळ नाश केला व ते वन ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य या चारीही वर्गाच्या लोकांसाठी मुक्त केले. इकडे दारका राक्षसीला पार्वती मातेने वर दिलेला असल्यामुळे पार्वती मातेने राक्षस कुळाच्या संरक्षणासाठी भगवान शिवशंकरांकडे आग्रह धरला व त्यासाठी या युगाच्या अंतापर्यंत राक्षसी सृष्टी अस्तित्व द्वारिकेची राणी बनवण्याबद्दल विनंती केली ती विनंती भगवान शंकरराणे तात्काळ मान्य केली तेव्हापासून पार्वतीने येथे कायम निवास केला. शिवाच्या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर व पार्वती मातेचे नाव नागेश्वरी पडले.

नागनाथ मंदिर चा परिचय मराठीत | Nagnath Temple Information In marathi


नागेश मंदिराचे शिल्प सौंदर्य अनुपम व नयनरम्य आहे पांडवकाळातील हे मंदिर संपूर्णपणे दगडाचे बनवलेले आहे मंदिर आणि चारही बाजूंना असलेली भिंत अतिशय मजबूत असून मंदिर प्रशस्त आहेत सभा मंडप आठ खांबांवर आधारलेले असून त्याचा सभा मंडपाचा आकार गोल आहे सभामंडप आणि गाभार हे एकाच पातळी बनवलेले आहे भगवान नागेशाची लिंगमूर्ती अंतर भागात असलेल्या छोट्या गाभाऱ्यात आहे.
नागनाथ मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमी मंदिरासमोर असणारा नंदी येथे समोर नसून मुख्य मंदिराच्या पाठीमागे वेगळे नंदी मंदिर आहे मुख्य मंदिराच्या चोहोबाजूंनी बारा ज्योतिर्लिंगाची छोटे मंदिर बनवण्यात आली आहेत याशिवाय वेध व्यास लिंग, भंडारेश्वर, चिंतामणेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती ,दत्तात्रय ,मुरली मनोहर , दशावतार इत्यादी अनेक मंदिर मूर्ती व आणि तीर्थ आहेत या तीर्थक्षेत्र 108 शिवालय आणि 68 तीर्थ आहेत.
नागनाथ मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे त्याच्या अंतर्भागातील ऋषी मोशन तीर्थांना सासु सुनेचे तीर्थ असे नाव पडले आहे या नागनाथ तीर्थक्षेत्रे दर बारा वर्षांनी कपिला षष्ठीच्या दिवशी काशीहून गंगा येते व येथे अवतरते यावेळी तीर्थकुंडातील पाणी अतिशय नितळ व स्वच्छ दिसते इतर वेळी ते हिरवट शेवाळीयुक्त असते. नागनाथ मंदिराच्या परिसरात अनेक देवतांच्या मुर्त्या आहेत याशिवाय प्राणी सैन्य तसेच कथा प्रसंगांवर आधारित अनेक शिल्पे आहेत एका मोठ्या कोपऱ्यात शिवपार्वतिची अप्रतिम शिल्प आहेत यात पर्वती रुसलेली असून शंकर तिची समजूत घालताना दिसतात हे चित्र पाहून भाविक आश्चर्यचकित होतात या शिल्प चित्रातील मूर्तीचे भाव अतिशय उत्कृष्ट आहेत. याशिवाय आनंदी महाराज चिखली इत्यादींची समाधी स्थाने संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची स्मृतीस्थानी येथेच आहे .

या गुरु शिष्यांची कथा अशी

नागनाथ मंदिर  कथा मराठीत | Nagnath Temple Story In marathi


शके बारा 1212 मध्ये औंढा नागनाथ क्षेत्रात संत गोरा कुंभाराच्या घरी एकदा सर्व संत मंडळी जमली यावेळी अतिशय सहजपणे गोरोबाकाकांनी सर्व संतांच्या डोक्यावर मडक्याची परीक्षा करताना मारतात तशा थपक्या मारल्या शेवटी गोरोबा काका म्हणाले संतांची मडकी पक्की आहे फक्त नामदेवाचे मडके कच्चे आहे हे एकूण नामदेवाला फार राग आला ते तडक उठून पंढरपूरला गेले. व त्यांनी तक्रारीच्या सुरात गोरा कुंभारांची वाक्य श्री विठ्ठलाच्या कानी घातले.

नामदेवांना पश्चाताप झाला भटकत भटकत ते औंढा नागनाथ मंदिरात पोहोचले तेथील दृश्य पाहून ते चकित झाले विसोबा कीर्तन नावाचा एक वयोवृद्ध शिवभक्त नागनाथाच्या पार्थिव लिंगावर पाय ठेवून झोपले होते. नामदेवाला ते पावले नाही ते म्हणाले हे तुम्ही काय करतात शिवलिंगावर पाय ठेवून झोप घेता काढा ते पाय यावर विसोबा खेचर म्हणाले मी म्हातारा झालो आहे. हे पाय हटविण्याचे त्राण नाही माझ्या शरीरात नाही. तुम्हीच हे काम करा तर फार उपकार होतील. नामदेवांनी विसोबा खेचर नावाच्या त्या बुद्धाचे पाय शिवलिंग उचलले व दुसरीकडे ठेवलेत पण पुन्हा तेथे शिवलिंग उत्पन्न झाले. त्या दुसऱ्या शिवलिंगावर विसोबांचे पाय होते अशा तऱ्हेने अनेक वेळा प्रयत्न करूनही विसोबा खेचर यांचे पाय जमिनीवर न दिसत शिवलिंगावर दिसायचे. शेवटी नामदेवांनी विसोबांना गुरु मानले व अनुग्रहाची विनंती केली नामदेवांना उद्देश केला प्रत्येक कणाकणात परमेश्वराचे अस्तित्व आहे. जगात अशी एकही जागा नाही की तिथे परमेश्वराचे वास्तव्य नाही अशा तऱ्हेने नामदेवांना विसोबा खेचर नावाचे गुरु मिळाले.
औंढा नागनाथ गावात विसोबा खेचर समाधी असून ती गुरू स्थान म्हणून ओळखली जाते .एकदा नागनाथ मंदिरात कीर्तन करण्याचा विचार केला त्यानुसार त्यांनी कीर्तनाला प्रारंभ केला त्यांच्या कीर्तनामुळे मंदिरातील ब्राह्मणांना पूजेचे मंत्र म्हणताना अडचण होऊ लागली, त्यामुळे त्यांनी संत नामदेवांना मंदिराच्या पाठीमागे जाऊन नामदेवांनी किर्तन सुरू करतात चमत्कार झाला नागनाथांचे संपूर्ण मंदिर फिरले व नामदेवाच्या समोरासमोर झाले. भगवान शंकर स्वतः नामदेवाचे कीर्तन ऐकण्यासाठी फिरले हे पाहून तेथील ब्राह्मणांना आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला. व त्यांनी नामदेवांची क्षमा मागितली.

मोगल काळात धर्मांध औरंगजेबाने या मंदिराला तोडण्याचा विचार केला त्यावेळी त्या मंदिरातून हजारो भुंगे निघाले व त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला त्यामुळे मंदिर तोडण्याचे काम अर्धवट सोडून त्याचे सैनिक पळून गेले औरंगजेबानेही हा विचार सोडला नंतर भाविकांनी मंदिराची पुन्हा दुरुस्ती केली असा इतिहास आहे .भाविकांनी येथे बऱ्याच वेळा श्री नागनाथाच्या ज्योतिर्लिंगावर फणा काढून बसलेले नागराजाची दर्शन होतात वाटीत ठेवलेले दूध हा नागराज कधी पितो हे कळत देखील नाही असा हा औंढा नागनाथाचा महिमा आहे जय श्री नागनाथ जय श्री नागनाथ हर हर महादेव ओम नमः शिवाय

Leave a Comment