नमस्कार मित्र-मैत्रिणींनो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.
भगवान शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री त्रंबकेश्वर होय. गौतमी नदीच्या तीरावरील हे ज्योतिर्लिंग एक अद्भुत व आश्चर्यकारक रूप आहे. येथील असलेल्या शिवलिंगावर इतर शिवलिंगांप्रमाणे गोलाकार नाही तर त्या ठिकाणी खलबत्या सारखा एक खोल खड्डा आहे. त्या खोल खड्ड्यात अंगुष्ठा मात्र म्हणजे अंगठ्यासारखे तीन लिंगी आहेत व ही तीन लिंगे म्हणजे ब्रह्मदेव, विष्णु भगवान आणि शिव शंकर भगवान म्हणजेच त्रंबकेश्वर आहे
या तीन पैकी महेश्वर म्हणजे शंकर भगवानच्या पिंडीवरून पाण्याचा छोटा झरा नेहमी वाहत असतो. निसर्ग देवतेने सुरू ठेवलेला हा जणू अखंड अभिषेकच आहे.
त्र्यंबकेश्वर या दिव्य ज्योतिर्लिंगातून कधीकधी सिंहगर्जना ऐकू येते तर कधी कधी गरम वाफा निघून अग्नीच्या ज्वालाही प्रकट होतात. अशावेळी श्री शंकराच्या वेग वेधापासून बचाव करण्यासाठी भांग मिश्री दुधाचे हांडे भरभरून शिवलिंगाला अभिषेक घालतात व रुद्र पाठ करतात. अशावेळी सर्व भांग मिश्रित दूध त्या शिवलिंगाच्या खड्ड्यात भरले जाऊन गायब होते या दुधाचे गायब होणे जेव्हा बंद होते तेव्हा महादेव शांत झाले व त्याचा राग मावळला असे मानले जाते. असे हे अलौकिक दिव्य ज्योतिर्लिंग कसे प्रकटले याची कथा आपण खालील लेखात पाहूया, तसेच या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो व सर्व देश आणि देशातील साधू संत येथे दर्शनासाठी येतात.
त्र्यंबकेश्वर मंदिराची कथा मराठी मध्ये | Trimbakeshwar Temple Story In Marathi
अहिल्यादेवीचे पती श्री गौतम ऋषी दक्षिणे कडील ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करीत होते त्या काळात तिथे जवळपास 100 वर्षे पाऊस पडला नाही परिणामी पशुपक्षी मरण पावू लागले. जमिनीवर व झाडावर 1 हिरवे पानही दिसत नव्हते.पशु पक्षी ऋषीमुनी यांना प्यायलाही पाणी न मिळाल्याने तेही तो परिसर सोडून जाऊ लागले. अशा घनघोर दुष्काळ पाहून गौतम ऋषींना ते सहन झाले नाही
त्यांनी सहा महिन्यांपर्यंत प्राणायामाद्वारे मांगलिक तप केले या तपणे प्रसन्न होऊन प्रकट झालेल्या वरून देवाकडून त्यांनी पाण्यासाठी प्रार्थना केली वरून देवाचे निर्देशानुसार गौतम ऋषींनी एक हातभर असा खड्डा जमिनीत खणला त्यात वरून देवाच्या कृपेने पाणी भरले गेले तेव्हा वरून देव गौतम ऋषींना म्हणाले, तुमच्या पुण्य प्रतापाने या खड्ड्यातील पाणी अक्षय तीर्थ होईल व ते कधीही संपणार नाही हे कुंड तुमच्याच नावाने प्रसिद्ध होईल व या ठिकाणी हवं हवन,श्रद्धा, कर्म व देवपूजा करणाऱ्याला अक्षय पुण्य फल प्राप्त होईल. असे सांगून वरून देव गायब झाले. हे या अमृतमय पाणी प्राप्त झाल्याने ऋषीमुनी आनंदित झाले व आपल्या यज्ञासाठी आवश्यक वस्तू त्यातून प्राप्त करू लागले व तिचे उत्पादन करू लागले.
एकदा गौतम ऋषींचे शिष्य त्या खड्डा रुपी कुंडातून पाणी आणण्यासाठी गेले त्याचवेळी इतर ऋषींच्या पत्नी ही तेथे पाणी भरण्यासाठी आल्या. आल्या-आल्या च त्या ऋषी पत्नीने अगोदर पाणी घेऊ द्यावे म्हणून हट्ट धरला गौतम ऋषींच्या शिष्यांनीही अहिल्यादेवींना बोलावून आणले आणि तिथे मध्ये हस्तक्षेप करून शिष्यांना अगोदर पाणी मिळावे असा निर्णय दिला. त्यामुळे इतर ऋषिपत्नीना ही गोष्ट अपमानास्पद वाटली त्यांनी आपापल्या आश्रमात जाऊन ही गोष्ट आपल्या पतीला तिखट मीठ मिरची लावून सांगितली व त्यांना भडकवून दिले या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व ऋषींनी गणपतीला विनंती केली की गौतम ऋषींचा अपमान होऊन त्यांनी इथून निघून जावे..श्री गणेशाय नमः
श्री गणेशाला या सर्व ऋषींचे अशी दूरभावना व कटू कौटुनीती पटली नाही. त्यांनी इतर सर्व ऋषींना गौतम ऋषींच्या हिताचा वर मागणी विषयी प्रकरणे समजावून सांगितले परंतु ऋषीमुनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी गणेशाला नाईलाजाने त्यांना हवा असलेल्या वर दिला पण सोबतच गौतम ऋषींना त्रास दिल्याबद्दल होणाऱ्या भावी परिणामाचा तोंड देण्यासाठी ही सज्ज राहण्याचा इशारा दिला. एके दिवशी गौतम ऋषी आपल्या हवनासाठी आवश्यक सामग्री घेण्यासाठी गेले तेव्हा एक अतिशय अशक्त हडकुळी गाय तेथे उभी होती. त्या गाईला तिथून बाजूला हटवण्यासाठी गौतम ऋषिंनी एका काठीद्वारे त्या गाईला हळूच मारले. तोच ती हडकुळी गाय कोसळली व मरण पावली बस मग काय विचारतात त्या सर्व इतर ऋषीमुनींनी एकच गोंधळ केला व गाय मारल्याचे पाप गौतम ऋषींच्या माथ्यावर ठेवले. एकूण महर्षी गौतम यांना फार दुःख झाले व त्या जागेला सोडून देऊन आपल्या पत्नी अहिल्या देवी सोबत तेथून निघून गेले.
गो हत्तेचा पातकातून मुक्तीसाठी गौतम ऋषिंनी इतर ऋषींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले तो मार्ग म्हणजे स्वतः तप करून गंगेला धरतीवर आणून त्यात स्नान करणे आणि दुसरे म्हणजे कोटी शिवलिंगे बनवून त्यांचे पूजन करणे त्यांच्या या तपश्चर्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले व म्हणाले तुम्ही तर शुद्ध अंतकरणाने ऋषी व महात्मा आहात. तुमच्यासोबत अन्याय झालेला आहे तुम्ही कोणतेही पाप केलेले नाही. नंतर शिवाने त्यांना एक वर मागण्या सांगितलं त्यावर गौतम ऋषिंनी प्रसन्न केली की गंगा धरतीवर प्रकट करून विश्वाचे कल्याण करावे. भगवान शंकरराणे गंगेचे तत्व रूप अविशित जलदृष्टींना प्रदान केले या प्राप्त झालेल्या गंगेला गौतम ऋषिंनी नमन केले व नंतर त्याच्या पापासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली.
गंगेने गौतम ऋषींना पवित्र केले व नंतर पुन्हा स्वर्गलोके जाण्यासाठी जाण्याची इच्छा प्रकट केली. पण भगवान शंकराने गंगेला या कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा आदेश दिला. यावर गंगेनेही भगवान शंकराला प्रार्थना केली व आपणही देवी पार्वती सह पृथ्वीवर निवास करावा, जगाच्या कल्याणासाठी तिचीही प्रार्थना शिवशंकराने मान्य केली. गंगेने भगवान शंकराला विचारले माझे महत्त्व जनतेला व जगाला कसे कळेल. तेव्हा सर्व ऋषीमुनी म्हणाले, जोपर्यंत सिंह राशी राहील तोपर्यंत आम्ही सगळे गंगा किनारी राहू रोज त्रिकाळ गंगेच्या या पवित्र जलामध्ये स्नान करू शिवपूजन करू त्यांच्या पुण्य प्रभावाने आमचे पाप नष्ट होतील हे एकूण भगवान शिव व गौतमी गंगा तेथेच राहिले आणि गंगेला गौतमी हे नाव मिळाले.
तर शिवशंकराच्या ज्योतिर्लिंग ला त्रंबकेश्वर हे नाव प्राप्त झाले. गोदान करणारी नदी गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली जेव्हा ही गोदावरी गंगा ब्रम्हगिरी पर्वतावरून निघाली तेव्हा तो मुहूर्त होता व्रह अवताराच्या अगोदरचा संधी पर्वाचा काळ गुरुसिंह नाशिक प्रवेश होता व तिची होती माघ शुक्र दशमी या दिवशी गुरुवारी मध्यांना वेळी गौतमी गंगा प्रकटली. ब्रम्हा, विष्णू व शंकराने दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप घेतले व त्र्यंबकेश्वर हे नाव धारण करून विश्व कल्याणसाठी तेथे निवास केला. हा ब्रम्हगिरी पर्वतही शिवलिंगासारखाच दिसतो याच्या शिखरावरून गोदावरीचा झरा
वाहत असतो.
ब्रह्मगिरीच्या ज्या कपारीतून गोदावरी निघते त्याला गंगाधार म्हणतात. येथे असलेल्या गोमुखातून तिची अखंड धार चालू असते. याच ठिकाणी गोदावरी मातेचे मंदिर असून मंदिरातील देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. जवळच वराह तीर्थ आहे. गंगाद्वारातून निघून गोदावरी थोडी पुढे जाऊन लुप्त होते. व पायथ्याशी पुन्हा प्रकट होते याठिकाणी अदृश्य होऊन गौतम ऋषींना तिच्या चारी दिशांना दरभवन करून टाकले त्यामुळे गंगा तिथेच अडवली गेली व त्या ठिकाणाला कुशावर्त महातीर्थ कुंड असे नाव पडले. कुशावर्त महातीर्थ कुंड हे 27 चौरस मीटरचे असून चौकोनी आकाराचे कुंड आहे. याची बांधणी अतिशय मजबूत असून आत जाण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत. सिंहस्थ पर्वावर प्रत्येक बारा वर्षानंतर येथे कुंभमेळा भरतो.
यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक स्नान करून पवित्र होतात या पवित्र कुंडाच्या चहूबाजूंनी बांधलेल्या अनेक सुंदर सुंदर मूर्ती ही कोरलेल्या आहेत. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कुशावर्ताजवळ गंगासागर नावाचे एक मोठे तळे आहे, या तळ्याजवळ संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ यांची समाधी आहे व गोरक्ष गुफा आहे. संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली त्यानंतर निवृत्तीनाथ उदास झाले ,कारण मोठ्या भावाच्या अगोदर लहान भावाने आपले अवतार कार्य संपवले. त्यांनीही काही काळानंतर आपल्या गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ यांना नाथपंथाची दीक्षा दिली होती असे म्हणतात. याच ठिकाणी श्री दत्तात्रेयांना देखील सिद्धी प्राप्त झाली होती. तेथून जवळच निल पर्वत असून तिथे निलांबरी देवीचे मंदिरही आहे काही भाविक तिला नीलम देवी असेही म्हणतात.
अंजनी पर्वतावर हनुमानाची आई अंजनी मातेने कठोर तप केले होते, ब्रह्मगिरीच्या डोंगरावर आजही तुटक्या अवस्थेत असलेल्या एक डोंगरी किल्ला आहे. फार पूर्वी देवगिरीच्या यादव यांनी तो बांधला होता त्यानंतर हा किल्ला मोगल मराठा निजाम पेशवे व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही तो पडक्या अवस्थेत आहे.
या ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करणे मोठे पुण्याचे कर्म मानले जाते. भाविक आपल्या सोयीनुसार 1, 11, 21 अशा फेऱ्या घालतात. या प्रदक्षिणामार्गावर रामतीर्थ, प्रयागतर्थ, नृसिंह इत्यादी सुंदर सुंदर स्थळे आहेत. श्रीमंत पेशव्यांनी दर 25 हात अंतर राखून वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे येथे घनदाट झाडे सावलीही आहे. झाडे सुखद हवा देतात पेशव्यांच्या काळात गुन्हेगारांना ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याची शिक्षा दिली जात असे.
त्र्यंबकेश्वराचे हे स्थान समुद्रसपाटीपासून जवळपास अडीच हजार फूट उंचीवर वसलेले आहे हे हे पवित्र तीर्थक्षेत्र थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास मराठीत |Trimbakeshwar Temple History In marathi
शिव शंकराचे हे भव्य मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी बांधले आहे. या मंदिराच्या बाजूने मोठ्या दगडी खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीचे मंदिर असून नगर रखण्यात रोज नगारा वाजविला जातो. या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी रोज पहाटेपासूनच नित्य पूजा अभिषेक अधिक कार्यक्रम होत असतात. काही विशिष्ट दिवशी मोठे उत्सव ही साजरे केले जातात यावेळी देवाला मौल्यवान वस्त्रे, अलंकारांनी सजविले जाते नंतर रत्नजडित मुकुट घालण्यात येतो.
नाशिकचे सरदार विंचुरकर यांनी देवाला एक सुंदर रथ बनवून दिला. सोमवारी मोठ्या थाटामाटात वाजत गाजत श्री त्रंबकेश्वर यांची पालखी निघते. नंतर कुशावर्तावर जाऊन परत येते, त्र्यंबकेश्वर जवळच अहिल्या नावाची एक छोटी नदी गौतमी ही गोदावरीला येऊन मिळते या संगम स्थळावर काही भावीक नागबळी नारायण बळीचा एक विशेष विधी करतात. ज्यांच्या घरात पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यामुळे मूलबाळ होत नाही ते लोक या दोषाचे निवारण करण्यासाठी हा विधी केला जातो हा विधी अंत्यसंस्कार व मृत व्यक्तींच्या उन्हाळ क्रियेसारखा असतो, हा विधी केल्यामुळे भाविकांवरील पितृदोष दूर होऊन व भाविकांना संतान प्राप्ती झालेली आहे.
हर हर महादेव…!!! ॐ नमः शिवाय..!!!