नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीला दुर्वा वाहतो, पण ही दुर्वा का वाहतात याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे-
हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याच्या आधी आपण गणपतीची आराधना करतो. व त्याला दुर्वा वाहतो गणपतीला दुर्वा का वाहतात याची माहिती किंवा याची कथा पुढीलप्रमाणे
गणपतीला दुर्वा का वाहत याची कथा मराठीत | Ganpati la durva ka arpan krta story in marathi
पूर्वीच्या काळी ऋषीमुनी व देवतांना अणलासूर नावाच्या राक्षस प्रचंड त्रास देत होता. त्यांना यज्ञ, होम हवन करू देत नव्हता. त्यामुळे सर्व ऋषीमुनी व देवता यांना आराधना देखील करू देत नव्हता. सर्व देव कंटाळून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व गणेशाला विनवणी केली की त्यांनी अणलासुराचा वध करावा. त्यांच्या या विनवणीचा मान ठेवून श्री गणेशांनी आणला सुराला गिळून घेतले. व त्यामुळे श्री गणेशाच्या पोटात जळजळ व्हायला लागली. पोटातील जळजळ शांत करण्यासाठी ऋषीमुनींनी गणपतीच्या डोक्यावर 21 दुर्वांची जुडी अशी डोक्यावर ठेवली, व गणपतीला गणेशाला 21 दुर्गांची जुडी ही बारीक करून खाण्यास दिली. ती दुर्वा पोटात गेल्यास त्याची पोटातील जळजळ ही शांत झाली. व गणपतींना आराम मिळाला. त्यामुळे श्री गणपतीला श्री गणेशाला दुर्वा वाहतात, अशी कथा प्रचलित आहे.