श्री गणेशाची स्वयंभू व जागृत आठ सिद्धक्षेत्र अष्टविनायक मराठी माहिती shree ashtvinayak ganpati information in marathi

 श्री गणेशाचे आठ स्वयंभू व जागृत सिद्ध क्षेत्र अनुक्रम नंबर

1) मोरगाव

2) सिद्धटेक

3) पाली

4) महड

5) लेण्याद्री

6) थेऊर

7) ओझर

8) रांजणगाव

 या आठ सिद्धक्षेत्रांची म्हणजेच अष्टविनायक यांची थोडक्यात व महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे

मोरगावचा मयुरेश्वर

श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन गणेश पिठान पैकी आद्यपीठ. या स्थानाचे महात्म्य मृगदल पुरानातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. दृशुंडी ऋषीच्या सांगण्यावरून ब्रम्हा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठानकडून गणेश पिठाची स्थापना केली. या स्थानी श्री गणेशाचे मोरावर बसून सिंधू व कमला सुर्वे त्यांचा संहार केला. या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते. त्यावरून येथे गणेशास मयुरेश्वर किंवा मोरेश्वर या नावाने संबोधण्यात येते. येथील मंदिराची उभारणी ब्रह्मदेवाने केली मंदिराच्या प्रवेशद्वारावरील श्लोक ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी याचे हे जन्मस्थान आहे. त्यांना येथे करा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली, त्यांनी या मूर्तीची चिंचवड येथे प्रतिष्ठापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देवस्थानाकडे आहे. वर्षातून दोन वेळा श्रींची पालखी चिंचवड चिंचवडहून येथे येते.

 चारशे वर्षांपूर्वी श्री योगेंद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गणपती संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना 228 वर्षांच्या आयुष्य लाभले येथील त्यांची समाधी व ध्यानमंदिर दर्शन या मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. संस्थानामार्फत गणेश संबंधी विपुल ग्रंथ प्रकाशक सध्या श्री गा ग बालविनायक महाराज लालसरे हे या मठाच्या गादीवर आहेत. सर्व आरत्यांच्या व शुभकार्यांचा प्रारंभ सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या आरतीने होते, ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री मयुरेश्वराचे दर्शन घेत असताना येथे उत्स्फूर्त रचली हे क्षेत्र कर हा नदीच्या तीरावर आहे. मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी असून गढी वजा आहे प्रवेश स्थानात भव्य दगडी उंदीर  व नंदी आहे.

 गणेशा समोर नंदी असणारे हे एकमेव स्थान आहे मंदिराच्या अवतारातील नग्न भैरवाचे आधी दर्शन घेऊन मगच श्रींचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. सभामंडपात आठ दिशांना आठ गणपती आहेत. व 34 परिवार मूर्ती आहेत. येथील कल्पवृक्षाखाली बसून अनुष्ठान केल्यास निश्चित फळ मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री मयुरेश्वराची मूर्ती शेंदूर चर्चित असून डाव्या सोंडेची आहे. विजयादशमीच्या येथील उत्सव वशिष्ठ पूर्ण असो असतो. हा उत्सव रात्रभर चालतो उत्सवात श्रीस तोफांची सलामी देण्यात येते. नंतर श्रींची पालखी गावात मिरवते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

सिद्धटेकचा सिद्धिविनायक

 सिद्धटेक येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली. हे क्षेत्र भीमा नदीकाठी आहे मधुर व कैटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्रीविष्णुने येथे श्री विनायकाचे आराधना केली .श्रीविष्णू सीएस येथे सिद्धी प्राप्त झाली. म्हणून येथील विनायका सिद्धिविनायक म्हणून ओळखू लागले. हे स्थान सिद्धटेक या नावाने ओळखण्यात येऊ लागली. भीमा नदी येथे दक्षिण वाहिनी आहे. नदीच्या दक्षिण वाहिनी प्रवाहास अतिशय पवित्र मानण्यात येते नदीला कितीही पूर आला तरी नदीच्या प्रवाहाचा आवाज या परिसरात होत नाही. हे येथील वैशिष्ट्य आहे नदीवरील दगडी घाट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. येथील मंदिर उंच टेकडीवर आहे. मंदिराचा भव्य गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवळासमोर भव्य महाद्वार मंदिरापर्यंतचा फरस बंदी रस्ता पेशव्यांचे मामा हरी हरिपंत फडके यांनी बांधला. सेनापतीपद गमावल्यानंतर त्यांनी येथे 21 दिवस अनुष्ठान केले श्री यांच्या कृपेने 21व्या दिवशी सेनापतींचे पद त्यांना पुन्हा प्राप्त झाले. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायक पैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती, उजव्या संस्थेच्या मूर्ती सिद्धिविनायक म्हणतात. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सगळे फार कडक असते. गणेशाला सकाळी खिचडी, दुपारी महानैवद्य ,संध्याकाळी दूध भात व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. चतुर्थी चतुर्थीलाही खिचडी चालते. मूर्तीचे सिंहासन पाषाणाचे आहे व प्रभावळ चांदीची आहे. येथील व्यवस्थापनात चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानाकडे आहे. मंदिराचा गाभारा डोंगराच्या एका टोकाला असल्यामुळे पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. ही प्रदक्षिणा एक किलोमीटर अंतराची आहे. मंदिरात 21 प्रदक्षिणा घातल्या घातल्यास मनोकामना सफल होते अशी श्रद्धा आहे.

पालीचा बल्लाळेश्वर

 बल्लाळस प्रसन्न होऊन श्री विनायक या ठिकाणी शिरा रुपी पाषाण मूर्तीत अंतर्गत पाऊले हे असतानाच सारसगडच्या भव्य किल्ल्याची व आंबा नदीच्या प्रवाहाची पार्श्वभूमी लाभली आहे.बल्लाळाची कथा गणेश पुराण व मृगदल पुरानात आहे. कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा सुपुत्र बालपणापासूनच त्याची विनायकावर अपार श्रद्धा होती, त्याने गावातील इतर मुलांनाही भक्तिमार्गास प्रवृत्त केले.त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याला क्रोधनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशाला दूर फेकून दिले व बल्लाळाचे हाल करून त्या झाडाला बांधून टाकले.  बल्लाळाने श्री गणेशाची आराधना केली श्री गणेश त्याला प्रत्यास प्रसन्न होऊन व त्याच्या विनंती म्हणून पाषाण रुपी मूर्ती प्रकट होऊन येथेच राहिले. व येथे बंधाळेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. बाळाेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धुंदी विनायकाचे मंदिर आहे. मूर्ती स्वयंभू आहे प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. बल्लाळाच्या येथील स्वयंभू मूर्ती भोवती भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे वास्तू कला कलात्मक देखणी आहे. मंदिराचे सर्व काम चीरे बंदी पाषाणाचे आहे. मंदिरात दोन भव्य गाभारी आहे. पाटील गाभाऱ्यात अष्टदिशा साधून अष्टकोनी कमळावर तयार करण्यात आले आहे. यावरील शिखरावर एक खोली असून त्यावर कलात्मक कळस उभारण्यात आला आहे. म्हणजेच मंदिर पूर्वाभिमुख असून अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे की, दक्षिणा दक्षिणायनाथ सूर्योदयाची  किरणे श्री बंडाळेश्वरांच्या मूर्तीवर पडावी या किरणांमुळे  श्रीच्या डोळ्यातील व नाभीतील हिरे  आसमंत झळाळून टाकतात. असे म्हणतात पाठीमागे चांदीचे कलात्मक प्रभावळ व मस्तकावर मुकुट आहे. कपाळी साडेअकरा पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा करता येते. दगडी गाभाऱ्यात चांदीने बनविलेल्या भव्य उंदीर आहे. मंदिरात चिमाजी अप्पांनी दिलेली भव्य घंटा आहे. मंदिरासमोर दोन रेखीव बांधणीचे तलाव वातावरणाची शोभा वाढवतात. मागे चतुर्थीस मध्यरात्री प्रत्यक्ष श्री बल्लाळेश्वर प्रसादाचे सेवन करतात अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भावी ही समारंभासाठी येतात.

महडचा वरदविनायक

 गानपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टय तसेच श्री गणानाथ वाया या मंत्राचे  प्रवर्तक ऋषी घुसमद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. मंदिराचा जिर्णोद्धार झाला असून नवीन बांधकाम अतिशय सुंदर व देखणे आहे. पेशव्यांनी बांधलेल्या हेमाडपंथी गावाला आहे. तो तसाच ठेवण्यात आला आहे. मंदिराजवळ देवाचे तळे आहे, याच तळ्याची वरद विनायकांची स्वयंभू मूर्ती इसवी सन 1690 मध्ये सापडली. ही मूर्ती भग्न झाल्यामुळे देवास्थानाने या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना केली. पुरातन मूर्ती गाभाऱ्याबाहेर दर्शनीय ठेवली आहे. मणिपूर, भद्रक, पुष्पक, मढ इत्यादी या स्थानाची पौराणिक नावे आहेत. आता महड हे नाव प्रचलित आहे रायगड जिल्ह्यातील महाड नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. महड व महाड या नावात अनेकदा गोंधळ होतो. उस्मसद ऋषींनी आपल्या  मातेला शाप दिला होता की त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील आरण्यात ओम गं गणपतये नमः या मंत्राचा अनेक वर्षे जप केला. श्री गणेश त्यांना येथे प्रसन्न झाले. त्यांनी गणेशा प्रार्थना केली की, त्यांनी येथे जाऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करावी, इच्छापूर्ती करणारा हा गणेश म्हणून यास येथे वरद विनायक म्हटले जाऊ लागले. भक्तांसाठी 24 तास उघडे असणारे हे एकमेव देवालय आहे. तसेच दुपारी बारापर्यंत स्वस्ते गणेशाची पूजा करता येते. 12  नंतर  कोरडी पूजा करण्यास परवानगी आहे. मंदिरात 1892 पासून सतत नंदादीप देवत आहे. येथे फक्त देवस्थानातर्फे दुपारी बारा ते दोन पर्यंत भक्तांना प्रसाद दिला जातो. भक्तनिवासा जवळ बांबूचा बेटात श्री दत्ताचे सुंदर मंदिर आहे.

थेऊरचा  चिंतामणी

 थेऊर येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिलमुनींनी केलेले आहे. हे स्थान मुळा मुठा नदीच्या काठी वसलेले आहे. कपिल   ऋषीमुनींच्या जवळ चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. गणासुर एकदा त्यांच्या आश्रमात आला होता, त्यांनी या रत्नाच्या साहाय्याने त्याला पंचपकपणाचे भोजन दिले. हे पाहून गणासुर अचंबित झाला होता व त्याला त्या रत्नाचा मोह पडला. त्याने कपिल  ऋषीमुनींकडे या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्यांच्याकडून त्याने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल   ऋषी मुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक म्हणजे गणपती बाप्पा प्रसन्न झाले, व त्याने गणासुराचे येथे कंदंभ वृक्षाखाली परिपत्य केले म्हणजे  त्या गणासुराचा तेथे वध केला व कपिल मुनींनी परत मिळालेल्या रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथील विनायकास चिंतामणी नावाचे संबोधले जाऊ  लागले. या नगरीस  कंदमनगर म्हणू लागले गौतम ऋषींच्या शापा पासून  मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच विनायकाची आराधना केली होती.

 चिंचवडच्या मोरया गोसावीने येथे तपश्चर्या केली होती. येथे विनायकाने मोरया गोसावी ला वाघाच्या रूपात त्यांना दर्शन दिले. या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थानाकडे आहे.श्री मोरेश्वर दिनकर पेंडसे हे चिंचवड देवस्थानाचे प्रतिनिधी आहेत. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे हे सर्वात आवडते ठिकाण मंदिराजवळच त्यांनी वाडा बांधला होता. शेवटच्या दिवसात म्हणजे आजारी पडले असताना शेवटच्या दिवसात त्यांनी चिंतामणीच्या सानिध्यात घालविले, व शेवटी चिंतामणीच्या चरणावर आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्याबरोबर सती गेल्या. मुळा मुठा नदीकाठी त्यांचे वृंदावन आहे. कार्तिक वद्य अष्टमीला सतीच्या वृंदावनात पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. येथील विनायकाची मूर्ती  स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. डोळ्यात माणिक  रत्न आहेत. हे मंदिर चिंचवड संस्थानाचे धरणी महाराज देव यांनी बांधले. माधवराव पेशव्यांनी सभा मंडप बांधला.  हरिपंत फडक्यांनी मंदिरात सुधारणा केल्या माघ अष्टमीला द्वार यात्रा असते. या यात्रेत गावातील सर्व भक्त मंदिरात जाऊन गणेशाची पूजा अर्चा केली जाते. ही द्वारे यात्रा पिरंगुटकर देव मंडळी तर्फे असते. श्री शैलेंद्र महादेव आगलावे व आगलावे बंधू वंश परंपरागत पुजारी आहेत.

लेण्याद्रीचा गिरजात्मज

 श्री गणेशाची म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना पार्वती मातेने त्यांच्या अंगातील मळ व उटणे यापासून श्री गणपती बाप्पा प्रकट झाले. व येथे पार्वती माता हिला श्री गणेश प्रसन्न झाले. याच गुहेतीने गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्याद्रीच्या स्वरूपात आहे. आजूबाजूला अनेक लेण्या आहेत. कुकडी नदीचे सानिध्यातही या स्थानास लाभले आहे. नदी तीन किलोमीटर अंतराहून वाहते. येथील गणेश गिरीजा चे म्हणजे प्रत्यक्ष पार्वती मातेचा आत्मज म्हणजे पुत्र असल्यामुळे यास  गिरिजात्मज म्हटले जाऊ लागली. गजाननाची पुत्र म्हणून आपणास प्राप्ती व्हावी यासाठी येथे पार्वतीच्या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली. गजाननाच्या पार्थिव मूर्तीची तिने येथे पूजा केली. गजानन प्रसन्न होऊन तिचा पुत्र म्हणून येथे अवतार धारण करण्याचे मान्य केले. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेत होऊन बटूस रूपात म्हणजेच बाल रूपात गणेश भगवान पार्वती समोर तो प्रकट  झाले. गणेश भगवान ज्यावेळेस प्रकट झाले. त्यावेळी त्यांना सहा दात तीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेश येथे सहवास घडला. या अवतारात गणेशाने अनेक दैत्यांचा संहार केला सतत 15 वर्षे गणेशाने येथे वास्तव्य केले, म्हणून या क्षेत्रात महात्म्य खूप थोर आहे. येथे एकूण 28 लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून, त्यास गणेश लेणी म्हणतात. सहाव्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे आवाजाचा प्रतिध्वनी सात वेळा उमटतो. लेण्याद्री मंदिरात जाण्यासाठी 321 पायऱ्या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. मंदिराचा सभामंडप रेखीव व भव्य आहे तो 58×60 फुटाचा आहे. व त्यास कोठेही खांबाचा आधार नाही. मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत. मूर्तीच्या मागचा भाग मोठ्या व लांबलच डोंगराने व्यापला असल्यामुळे गणेश मूर्तीस प्रदक्षिणा घालता येत नाही. मूर्तीस कोणतेही अलंकार नाहीत. लेणी परिसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात आहे. मंदिरातील केवळ पूजा  विश्वस्तानमार्फत होते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरातत्त्व खाते पाच रुपये आकारते. लेण्याद्री हे लेणी परिसराचे नाव असून ते गोळेगाव या गावाच्या हद्दीत येते.

ओझरचा विघ्नेश्वर

 सर्व देवांनी मिळून या गणपती बाप्पाची स्थापना येथे केली. हे स्थान कुकडी नदीकाठी आहे. विघ्न सुराचे पारिपत्य करण्यासाठी श्री गणेशाने येथे स्वतःचा अवतार धारण केला.अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपत मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला ही वार्ता इंद्र देवास कळल्याने यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्न सुरास आज्ञा दिली विघ्नहसूर केवळ अभिनंदन राजाच्या यज्ञाचा नाश करून थांबला नाही, तर त्याने सर्वच देव धर्माला आव्हान दिले देवांनी हे संकट दूर करण्यासाठी श्री विनायकाची आराधना केली. मग गजाननाने पाराशर ऋषींचा पुत्र म्हणून येथे अवतार घेतला. व विघ्नेश्वराचा यास ठिकाणी नाश केला. माझे नाव धारण करून आपण येथेच राहावे ही विघ्नेश्वराची प्रार्थना गजाननाने स्वीकारली. व ते येथे विघ्नेश्वर तसेच विघ्नहर या नावाने राहिले. श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वभिमुख असून चारही बाजूंनी दगडी तट आहे मंदिराच्या आवारात दोन रेखीउद्दीपमाळा आहेत घाबरत चारही बाजूस पंचायतनांच्या मूर्ती आहेत नग मंदिराचे नक्षीकाम प्रेक्षणीय आहे श्रींची मूर्ती दावे सोंडेची असून पूर्णकृती आसन मांडी घातलेली आहे मंदिराचे शिखर व कळस सोनेरी आहेत चिमाजी अप्पांनी वसईच्या लढाईत विजय मिळविल्यानंतर या मंदिराच्या जिर्णोद्धार केला. ट्रस्ट द्वारा दरवर्षी नाममात्र दरात तीनशे सामुदायिक विवाह लावण्यात येतात.

रांजणगावचा श्री महागणपती

 हे क्षेत्र श्री भगवान शंकर भगवान आणि बसविलेले असून. त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. ग्रुप्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय गुणवंत झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शिवशंकर  यांनी  त्रिपुरासुर यास पारिपत्य करण्याचे मान्य केले. व येथे शंकर भगवानने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकर भगवान यांनी त्रिपुरासुराचे पानिपत्य केले. या वेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून मानण्यात येऊ लागले. मंदिर येथील पूर्वभिमुख असून उत्तर नारायणात सकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. व येथील वैशिष्ट्य आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा गाभारा बांधला सभामंडप इंद्र इंदूरचे सरदार किबे यांनी बांधला. व सभोवतालच्या उघड्या पेशव्यांचे सरदार शिंदे व पवार यांनी बांधल्या. जीर्णोद्धारानंतर हे मंदिर सुंदर भव्य आकर्षक झाले. मंदिरास लागून सुंदर उद्यान तयार करण्यात आले आहे. थोरले माधवराव पेशवे स्वारीवर निघताना श्रींचे आशीर्वाद घेऊन जात असत. पेशव्यांनी येथील  अन्याबा यांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी  अन्यबा यांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघते. भाद्रपद महिन्यात रांजणगावात घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही. सर्वजण मंदिरातील गणेशाची पूजा करतात. देवस्थानातर्फे सुवर्ण अथर्वशीर्ष पट निर्माण करण्यात आला आहे. या प्रकाराचा देशातील हा पहिलाच उपक्रम आहे.

श्री गणेशाला दूर्वा का वाहतात?


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीला दुर्वा वाहतो, पण ही दुर्वा का वाहतात याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे-
हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याच्या आधी आपण गणपतीची आराधना करतो. व त्याला दुर्वा वाहतो गणपतीला दुर्वा का वाहतात याची माहिती किंवा याची कथा पुढीलप्रमाणे

गणपतीला दुर्वा का वाहत याची कथा मराठीत | Ganpati la durva ka arpan krta story in marathi


पूर्वीच्या काळी ऋषीमुनी व देवतांना अणलासूर नावाच्या राक्षस प्रचंड त्रास देत होता. त्यांना यज्ञ, होम हवन करू देत नव्हता. त्यामुळे सर्व ऋषीमुनी व देवता यांना आराधना देखील करू देत नव्हता. सर्व देव कंटाळून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व गणेशाला विनवणी केली की त्यांनी अणलासुराचा वध करावा. त्यांच्या या विनवणीचा मान ठेवून श्री गणेशांनी आणला सुराला गिळून घेतले. व त्यामुळे श्री गणेशाच्या पोटात जळजळ व्हायला लागली. पोटातील जळजळ शांत करण्यासाठी ऋषीमुनींनी गणपतीच्या डोक्यावर 21 दुर्वांची जुडी अशी डोक्यावर ठेवली, व गणपतीला गणेशाला 21 दुर्गांची जुडी ही बारीक करून खाण्यास दिली. ती दुर्वा पोटात गेल्यास त्याची पोटातील जळजळ ही शांत झाली. व गणपतींना आराम मिळाला. त्यामुळे श्री गणपतीला श्री गणेशाला दुर्वा वाहतात, अशी कथा प्रचलित आहे.

 

Leave a Comment