श्री केदारनाथ मंदिर मराठी माहिती | Shri Kedarnath Temple Information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी टेक केदारनाथ या ज्योतिर्लिंगाची माहिती घेणार आहोत ती माहिती पुढील प्रमाणे

भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी बर्फाळ प्रदेशात असलेले श्री केदारनाथ हे एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे. हिमालयाच्या देवभूमीत देवी भूमीत असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त सहा महिनेच करता येते.

कार्तिक ते अश्विन असे फक्त सहा महिनेच येथील तीर्थयात्रा करता येते कारण इतर उरलेल्या सहा महिन्यात अतिशय थंडी व बर्फांचा पाऊस यामुळे हे मंदिरदर्शनासाठी बंद ठेवलेले असते.

कार्तिक महिन्यात बर्फदृष्टी वाढल्यानंतर येथील मंदिरात तुपाचा नंदादीप लावतात व श्री केदारनाथाचे भोग सिंहासन बाहेर आणून मंदिर बंद केले जाते. कार्तिक ते चैत्र असे सहा महिने श्री केदारनाथाचे वास्तव्य डोंगराच्या पायथ्याशी मठात असते. वैशाखात बर्फ वितळू लागल्यानंतर केदारनाथाचे मंदिर पुन्हा उघडले जाते. तेव्हा याची दारे उघडली जातात तेव्हा कार्तिक महिन्यात पेटवलेला नंदादीप वैशाखातही अखंड तेवत असलेला दिसतो.

दिव्य ज्योतीचे दर्शन करतात. काशी मोक्ष देणारी मायापुरी मानवतात. या हरिद्वारापासून पुढे ऋषिकेश देव प्रयाग, रुद्रप्रयाग, सोन रयाग, आणि त्रियोगी नारायण गौरीकुंड या मार्गायाने केदारनाथला जाता येते. यातील काही प्रवास वाहनाने तर काही प्रवास पायी करावा लागतो.

हिमालयातील हा मार्ग अतिशय दुर्गम व खडतर आहे पण आपल्या श्रद्धेच्या बळावर भाविक हा कठीण मार्ग पार करत अनेक संकटांवर मात करून केदारनाथ यांचे दर्शन घेतात. कठीण चढणीचा हा रस्ता घोड्यावर बसून कोणी कावडीत बसून तर काही भाविक झोळीत बसून पार करतात याबाबतची सोय येथे केली जाते आराम करण्यासाठी मार्ग ठीक ठिकाणी मठ धर्मशाळा आणि आश्रम आहेत गौरीकुंड येथे पोहोचल्यावर भावी तेथील कुंडात असलेल्या गरम पाण्यात स्नान करतात आणि मस्तक म्हणजे शीर नसलेल्या गणेशाचे दर्शन करतात.

हे गौरीकुंड श्री गणेशाचे जन्मस्थान मानले गेले आहेत. या ठिकाणी पार्वती पुत्र गणेशाला श्री शंकराने त्रिशूल मारून त्याचे मस्तक धडा वेगळे केले होते पण नंतर पार्वतीच्या आग्रहाखातर हत्तीचे मुख लावून गणेशाला जिवंत केले होते गौरी कुंडापासून काही अंतरावरच उंच हीमशीखरांच्या सानिध्यात मंदाकिनी नदीच्या पर्वतरांगांमध्ये भगवान शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथ चे मंदिर दिसते.

हेच कैलास म्हणजे भगवान शंकराचे आद्य निवासस्थान आहे. पण येथे शंकराने शिवलिंग किंवा मूर्ती नाही फक्त एक त्रिकोणी आकाराचा उंचवट्यासारखा भाग आहे असे म्हणतात की तो महेशाचा पाठीचा भाग आहे या ज्योतिर्लिंगाच्या अशा आकाराबद्दल जे आश्चर्यजनक कथा आहे ती खालील प्रमाणे…

केदारनाथ मंदिराची कथा मराठीत| Kedarnath Temple Story ln Marathi

कौरव पांडव यांच्यात झालेल्या युद्धात आप्तस्वकीय मारले गेले. त्या पापांचे प्रायचित्त घेण्यासाठी ते काशीला आले पण त्यांना तेथे कळले की भगवान शंकर सध्या हिमालयातील कैलासावर गेलेले आहेत पांडव काशीहून निघाले आणि हरिद्वार मार्गे हिमालयात पोहोचले दुरून त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले पण पांडवांना ते पाहून शिव शंकर अदृश्य झाले, पांडू म्हणाले देवा आम्हाला आपल्या दर्शनाची इच्छा आहे आम्ही तुम्हाला निश्चित शोधून काढू आपल्या दर्शनाने आमचे सगळी पापे नष्ट होणार आहेत तुम्ही जेथे अदृश्य झाला आहात ते स्थान आता गुप्तकाशी म्हणून ओळखले जाईल.

गुप्त काशी म्हणजेच रुद्रप्रयाग. येथून पुढे जाऊन पांडव हिमालयातील कैलास गौरी कुंड आधी भागात भटकत राहिले व भगवान शंकराला शोधत फिरू लागले, एवढ्यात नकुल व सहदेव आला एक हेला त्याचे विचित्र रूप पाहून धर्मराज म्हणाला देवाने म्हणजे शिवशंकराने हेल्याचे रूप धारण केले आहे ते आपले सर्वांचे परीक्षा घेत आहे. मग काय विचारता गदाधारी भीम त्या हल्ल्याच्या मागे लागला हेला पुढे आणि भीम त्याच्यामागे शेवटी भीम थकला पण हेला का त्याच्या हाती लागला नाही शेवटी एक ठिकाणी तो भीमाला दिसलास भीमाने त्याच्यावर आपल्या गतीने प्रहार केला व त्याला जखमी केले त्यामुळे त्या हेल्याची जमिनीत तोंड फसले व तो हेला तेथेच बसून राहिला नंतर भीमाने त्याचे शेपूट धरून त्याला ओढले या ओढल्यामुळे त्या हेल्याचे मुख सरळ नेपाळत जाऊन पोहोचले व त्याच्या पार्श्वभाग फक्त केदारधामात राहील आणि नेपाळ ते मुख पशुपतिनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले.

भगवान महेशाच्या या पार्श्वभागातून एक दिव्य ज्योत प्रकट झाली त्या ज्योतीतून भगवान शंकर प्रकट झाले पांडवांनी मनोभावे त्यांना प्रणाम केल्या शिवदर्शनाने पांडवांचे पापक्षालन झाले. भगवान शंकर पांडवांना म्हणाले मी आता या त्रिकोणी आकारातच ज्योतिर्लिंग रूपात येथे कायम राहतो. केदार नाथाच्या दर्शनाने भाविक पवित्र होतील व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील या परिसरात पांडवांच्या अनेक स्मृती आहे. पांडू राजा याचवनात राणी कुंती सोबत विहार करताना मरण आले होते, ते ठिकाण पांडुकेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. येथील आदिवासी पांडवण त्या सदरात करतात त्या शिखरावरून बांधवांनी स्वर्गरोहण केले. ते ठिकाण स्वर्गरोहीनी म्हणून प्रसिद्ध झाले धर्मराज दृष्टीने जेव्हा स्वर्गात जात होते तेव्हा त्यांचा एक अंगठा गळून पडला होता, तेथे त्यांनी अंगठ्याऐवजी शिलिंगाची स्थापना केली होती. हेल्याचे रूप घेतलेल्या शंकरावर गदा प्रवाह प्रकार केल्याच्या भीमाला फार पश्चाताप झाला त्यामुळे तूप घेऊन त्या शंकराची मालिश करू लागला. या गोष्टीची आठवण म्हणून आजही या त्रिकोण या कृती दिव्य ज्योतिर्लिंग ला म्हणजे केदारनाथला तूप चोळण्याची प्रथा आहे येथे भगवान शंकराच्या पूजेची हीच पद्धत आहे. पाण्याचा अभिषेक येथे करत नाही व बेलाचे पाने , फुले वाहत नाही.

केदारनाथ मंदिराचा इतिहास मराठीत |Kedarnath Temple History In marathi

फार पूर्वी नरनारायण नावाचे दोन ऋषी बद्रिकाच्या मेथे जाऊन पार्थिव शिवलिंगाचे पूजन करीत असत त्यावेळी भगवान शंकर प्रकट झाले या पार्थिव शिवलिंगातून एके दिवशी प्रकट झालेल्या शंकराने वर मागा असे सांगितले तेव्हा नर नारायण ऋषींनी त्यांना प्रार्थना केली की लोककल्याणासाठी आपण येथेच निवास करावा या विनंतीला मान देऊन महादेव त्यांनी त्या हिमासचित केदार नावाच्या स्थानावर ज्योती रूपात स्थिर झाले आणि त्यांचे नाव केदारेश्वर पडले केदारेश्वराच्या दर्शनाने स्वप्नातही दुःख होत नाहीत पांडवांची सगळे दुखे यांच्या दर्शनाने संपली या ठिकाणी ज्योतिर्लिंगे पूजेचे प्राणिमात्राला जन्म त्याच्या पापातून मुक्ती मिळते दान धर्म करण्याला साज्य मुक्ती मिळतो. शिवाशी एक आकार होतो केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे आद्य श्री शंकराचार्यांची समाधी आहे.

भूगुपतन म्हणजे भैरवडा नावाचा एक भयानक डोंगरकडा आहे. तेथे पोहोचण्यासाठी साक्षात मृत्यूची सामना करावा लागतो. मंदिरात आठ दिशांना अष्ट तीर्थ आहेत. श्री केदारनाथाच्या दर्शनाला जाताना अतिशय कठीण व खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो, पण मनात श्रद्धा असेल व मनात ओढ असेल तर चालण्याचे श्रम व थकवा जाणवत नाही सर्व भाविकांच्या मुखातून फक्त” जय केदारनाथ जय केदारनाथ जयघोष चालू असतो जय शिवशंकर हर हर महादेव ओम नमः शिवाय”

केदारनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याच सोबत पंच केदार हा छोटा धाम या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये देखील एक आहे. केदारनाथ मंदिराविषयी असे म्हटले जाते की, या चार या मंदिराचे दर्शन केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. मोक्षाचे द्वार आपल्यासाठी उघडे असतात. येथील नयनरम्य दृश्याचे दृश्याचे परिसराचे दर्शन खूपच अल्हाददायक व निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे.मंदिराच्या बाजूला मंदाकिनी नदी वाहताना दिसते, या मंदिराचे बांधकाम राखाडी कलरच्या दगडांपासून करण्यात आले आहे. केदारनाथ धामाचे दरवाजे 2023 मध्ये 25 एप्रिल 2023 रोजी भक्तांना मंदिरा दर्शन घेण्याकरता खुली करण्यात आली आहे. या केदारनाथ मंदिराला आतापर्यंत अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे महापूर, भूकंप, हिमस्खलन, यासारख्या सर्व नैसर्गिक संकटांचा सामना करून मंदिर ठामपणे उभे आहे. या मंदिरात पांडव, कुंती द्रोपदी यांची भव्य मूर्ती पहावयास मिळते आपण आपण सर्वांनी एकदा तरी इथे भेट द्यावी.
ओम नमः शिवाय
हर हर महादेव.
जय भोलेनाथ

Leave a Comment