नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत
वारुणी आणि अशी नावाच्या दोन नद्या जेथे गंगेला मिळतात तेथे फार पूर्वी एक नगर बसविण्यात आले होते त्या नगराचे नाव वाराणसी असे ठेवण्यात आले. तीन नद्याचे संगम स्थळ असलेल्या वाराणसी या तीर्थक्षेत काश या जातीची लोक राहतात म्हणून तिला काशी असेही नाम देण्यात आले. या क्षेत्राजवळ गंगेला धनुष्यासारखा आकार आलेला आहे म्हणूनही या क्षेत्राला फार महत्त्व आहे.देवदास नावाचा एक महान राजा या नगरीचा शासक होता त्यानेच या क्षेत्राचा विस्तार केला.
कथा अशी आहे.
काशी विश्वेश्वर कथा मराठीत |Kashi vishaveshwar Story In Marathi
निर्विकार चैतन्य व सनातन ब्रह्म यांनी प्रारंभी आपले निर्गुण रूप त्यागून सगुण साकार शिवरूप धारण केले. नंतर त्यांचे शिव व शक्ती असे स्त्री पुरुष दोन भेद केले प्रकृती पुरुष शिवशक्ती ला भगवान शिवानी आज्ञा केली व उगम सृष्टीच्या रचनेसाठी तपश्चर्या करण्याचे आदेश दिले. ही आकाशवाणी ही कोणत्या तपश्चर्या साठी उनमस्थान सुचविण्याची प्रार्थना भगवान शिवाला केली. तेव्हा निर्गुण निराकार शिवानी आपल्या प्रेरणेने अतिशय तेजस्वी शोभा यमान नगरीची सृष्टी केली त्या नगरात उपस्थित होऊन श्रीविष्णुने अनेक वर्ष शिवाचे ध्यान करीत तप केले. त्यांच्या या तप प्रभावाने तेथे अनेक जलधारा प्रकटल्या हे अद्भुत दृश्य पाहून चकित झालेल्या श्री विष्णू ने आनंदाने मान डोलावली तोच त्याच्या कानातून एक दिव्य मनी खाली पडला.
त्यामुळे या स्थानाला मणिकर्णिका तीर्थ असे नाव पडले. त्या पवित्र तीर्थातील पाण्याने दहा मैलचा परिसर व्यापला भगवान शिवाने ही सर्व जलराशी आपल्या त्रिशुलावर धारण केली व त्या पाण्यात श्रीविष्णूंनी लक्ष्मी सह विश्राम केला नंतर भगवान शंकराच्या आज्ञेने श्री विष्णूच्या नाभी स्थळातून म्हणजे बेंबीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाला शिवशंकराने सृष्टीची रचना करावी असा आदेश दिला त्यांच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली त्यात 50 कोटी योजना लांबी रुंदीचे 14 लोक आहेत. आपल्याच कर्माने बांधले गेलेल्या प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी शिवाने पंचकोशी नगराला बाकीच्या विश्र मान पासून वेगळे ठेवले.
यास पंचक्रोशी नगरात भगवान शंकरांनी मुक्तीदायक अशा स्वतःच्या ज्योतिर्लिंगाची स्वतःच्या हस्ते स्थापन केली. नंतर या पंचक्रोशी अर्थात काशी त्रिशूलावर अवतरण केली .शंकराने तिला मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर स्थापन केले तेव्हा ब्रह्मदेव दिवस पूर्ण होतो. व प्रलय येतो तेव्हा ही नगरी नष्ट होऊ नये म्हणून स्वतः महादेव तिला पुन्हा आपल्या त्रिशुळावर धारण करतात. याच काशी नगरीत अविमुक्तेश्वर शिवलिंग स्थापन केलेले आहे याच्या दर्शनाने ज्यांना मुक्ती होण्याची शक्यता नाही अशांचीही मुक्ती होते. व ते मोक्षाला जातात अशी ही महान पुण्यदायक पंचक्रोशी म्हणजेच काशी नगरी कोटी कोटी पातकांचा नाश करते. आणि सहाय्य नावाची उन्नत मुक्ती प्रदान करते याच कारणामुळे देव देखील या नगरीत मृत्यू यावा अशी कामना करतात. कारण ही नगरी ब्रह्मदेव श्री विष्णू आणि शंकराने स्थापन केलेली आहे.
बाहेरून प्रार्थनेवर प्रसन्न होऊ शकणार आणि माता पार्वती सह या नगरीत आपला कायम निवास ठेवला व विश्वनाथ हे नाव धारण केले काशी नगरी मोक्षदायक आणि ज्ञानदात्री आहे येथे राहणाऱ्यांना कोणाचीही यात्रा न करता ही मोक्ष मिळतो भगवान शंकर म्हणतात या काशी नगरीत मरणारे बालक ,ब्राह्मण ,क्षत्रिय, वैश्य ,शूद्र, प्राणी इत्यादी कोणतीही असे ते मोक्षाला जातात यातील मात्र शंका नाही. कोणताही मनुष्य कोणताही आहार करणारा असो कोणतेही कर्म करणारा असो या नगरीत प्राणत्याग केल्यावर नी संदेह त्याची मुक्ती होते येथे केलेल्या कोणत्याही पुण्यकर्माचा हजारो काल पर्यंतही नाश म्हणजे क्षय होत नाही शुभ अशुभ कोणत्याही प्रकारे जन्मलेल्या मनुष्याला काशीत गेल्यावर निश्चितच मुक्ती मिळते अशा या पुण्यवान ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनेक मंदिरे बनवण्यात आली.
बनार नावाच्या राजाने या काशीचे वैभव वाढवले या नगरीत बनारस असेही नाव मिळाले. संपूर्ण काशीद क्षेत्रात दीड हजारांवर भव्य मंदिरे आहेत. आणि ते श्री विश्वेश्वराचे मंदिर तर शंभर फूट उंच आहे जलप्रलय म्हणजेच महाप्रलयाच्या काळातही काशी क्षेत्र नष्ट होत नाही कारण दंड पाणी भगवान शंकर व कालभैरव हे या नगरीचे सदा सर्वदा रक्षण करतात. यांनी या नगरीला आपले कायम निवासस्थान बनवले आहे. येथे श्री गंगेच्या काठावर अतिशय मजबूत व सुंदर असे 84 घाट बांधलेले आहेत. तसेच अनेक तीर्थ कुंड येथे विद्यमान आहेत. ज्या काशी नगरीचे वैभव वेदकाळापासून अबाधित आहे आणि जी हिंदू धर्मीयांची पवित्र नगरी आहे. अशी ही काशी नगरी मुस्लिम सणाधिकांच्या डोळ्यात सलत होती
इ.स 1033 ते 1669 पर्यंत या मुगल मुसलमान शासकाने अनेक वेळा काशी या तीर्थक्षेत्रावर आक्रमणे केली व तिचा विध्वंस केला. अनेक मंदिरे पाडली व त्याच्या जागी मशिदी उभ्या केल्या ,पण भगवान शंकराच्या कृपेने आणि हिंदूंच्या तेजस्वी भक्ति मुळे पुन्हा या ज्योतिर्लिंग असतानाचा विकास होतच राहिला इंग्रज व मराठ्यांच्या काळात विश्वेश्वराचे हे वैभव शिखरावर गेले,आणि नंतर जैन व बौद्ध धर्म यांनी ते वैभव सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले
काशी विश्वेश्वर मंदिर परिचय मराठीत| Kashi vishaveshwar Temple Information Marathi Marathi
आज अस्तित्वात असलेले काशी विश्वनाथ मंदिर हे इ.स 1777 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी बांधले आहे. इ.स1785 मध्ये काशीचा राजा माणसा राम व त्याचा पुत्र बलंत सिंह यांनी वाराणसी अनेक मंदिरे बनवली ही इ.स 1755 मध्ये औंध संस्थानाच्या पंतप्रधानांनी येथील प्रसिद्ध बिंदू मंदिराची दुरुस्ती करून त्याचे अतिशय सुंदर पुनरुज्जीवन केले इ.स 1852 मध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी येथे कालभैरव मंदिर बनविले महाराजा रणजीत सिंह यांनी या विश्वनाथ मंदिराचे शिखर सोन्याने मडविले तर नेपाळच्या राजाने येथील प्रचंड घंटा अर्पण केलेली आहे येथून जवळच असलेल्या सारणाच्या परिसरात बौद्ध धर्मियांचे अनेक स्तूप विहार व चैतन्यगृह आहेत ही 1931 मध्ये महाबोधी सोसायटीने सारनाथ येथे सुंदर बौद्ध मंदिर बांधले आहे.
जगभरातील हिंदू लोक काशी क्षेत्राच्या दर्शनाला येतात व धार्मिक कार्य पूर्ण करतात तसेच देश विदेशातील इतर धर्माचे लोकही या क्षेत्राला भेट देतात व येथील प्रेक्षणीय गंगा घाट मंदिर तपोभूमी नैसर्गिक सौंदर्य पाहून चकित होतात काशी क्षेत्र व श्री विश्वनाथ जगातील अतिशय पवित्र स्थान आहे येथील गंगा टोक भूतलावर अमृतच आहे येथे येणारा मृत्यू होणारा अंत्यसंस्कार मुक्तीचा मार्ग मानला जातो अष्ट प्रहर जय गंगे !जय विश्वनाथ !ओम नमः शिवाय! हर हर गंगे! अशा जय घोषनी वातावरण गजबजून जातो असे हर हर महादेव ओम नमः शिवाय!
उत्तर भारतात स्थापन झालेल्या श्री विश्वेश्वर काशीविश्वेश्वर या ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम वाराणसी या शहरात यावे लागेल. यासाठी या ठिकाणी वाहतुकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. एक तर तुम्ही हवाई मार्गाने वाराणसीला येऊ शकता. वाराणसी या शहराला बनारस ,काशी ,वाराणसी असे तीन नावे देण्यात आले आहेत. तुम्ही रेल्वे मार्गाने किंवा रस्त्याने वाराणसी, काशी, बनारस या ठिकाणी येऊन पोहोचू शकतात. वाराणसी या शहरापासून अगदी जवळ म्हणजे 18 किलोमीटरवर लाल बहादूर शास्त्री विमानतळ आहे. वाराणसी साठी मुंबई, चेन्नई, आग्रा, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ येथून थेट उड्डाणे आहेत. काशी विश्वनाथ नगर हे रेल्वेच्या माध्यमा माध्यमातून देशातील सर्व मेट्रो आणि प्रमुख शहरांशी जोडले गेले आहेत. वाराणसी शहर इलाहाबाद पासून १२८ किलोमीटर, बोधगया पासून 240 किलोमीटर तर लखनऊ पासून 286 किलोमीटर अंतरावर आहे. काशी विश्वेश्वराचे मंदिर दररोज सकाळी अडीच वाजता उघडते व रात्री अकरा वाजता मंदिर बंद होते. मंदिरात प्रवेश मिळत नाही काशी विश्वेश्वर हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.