नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओमकारेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती घेऊया
विद्याचल पर्वताच्या परिसरात मध्यप्रदेशातून लोकमाता नर्मदा नदी पश्चिम वाहिनी होऊन वाहते. तिची विपुल जलराशी धीर गंभीरपणे वाहत भूतलाचे पाप ताप यांचे हरण करते. डोंगरदर्यातून खळाळत वाहणाऱ्या नर्मदेला रेवा देखील म्हणतात. धारेतील गोल गुळगुळीत दगडांना बाणलिंग म्हणतात. नर्मदेतील प्रत्येक दगड हा प्रत्यक्ष शंकरच आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नर्मदेला शांक्री नदी या नावाने ही ओळखतात. याच नर्मदेच्या काठावर तिच्या वाहत्या प्रवाहात एक बेट आहे या विशाल बेटावर भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंग पैकी चौथे ज्योतिर्लिंग ओंकार ममलेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
तेथील बेट व नदीची धार देखील ओम आकाराची आहे. नर्मदेची परिक्रमा करणारे भाविक या ओंकारेची ही परिक्रमा करतात व ज्योतिर्लिंग दर्शनाने स्वतःला धन्य मानतात. या ठिकाणी नर्मदेचा किनारा व ओमकार द्वीप हा परिसर अतिशय सुंदर व मनोराम आहे तेथील निसर्ग सौंदर्य ही मनाला भुरळ घालते. नर्मदेच्या किनाऱ्याचे हिरवे मजबूत खडक त्यांची उतरंड व उतरंडी वरची घरे, तेथील मंदिर, वाहत्या जलधारेतील डोह पाहण्यासारखे आहे. या दोन्ही डोहांमध्ये मोठे मासे तर दिसतातच पण भयानक मगरींचेही तिथे वास्तव्य आहे. ओमकार बेटावर वृक्षवेलीने नटलेला परिसर आहे झाडांवर माकडांच्या चेष्टा चालू असतात. पक्षी कलह करत असतात आणि मंदिरांची शिखरे झळकत असतात. त्यातच भक्तांचा ओम नमः शिवाय असा जयघोष चालत असतो .अशा या ठिकाणी भगवान शंकर ओंकारेश्वर नावांनी अवतीर्ण झाले त्याची कथा अशी आहे.
ओंकारेश्वर मंदिर कथा मराठीत | Omkareshwar Temple Story In Marathi
प्राचीन काळी दानवांनी देवांना युद्धात हरविले होते त्यामुळे इंद्र देव चिंतेत झाले. दानव जिंकल्यामुळे उन्नत झाले होते व त्यांनी तिन्ही लोकांत गोंधळ घातला. देवतांपुढे बल प्राप्त व्हावे म्हणून महादेवाने दिव्य ज्योतिर्मय ओमकार रूप धारण केले. समस्त देवांनी त्या शिवलिंगाची स्थापना केली व त्याचे पूजन केले त्याच्या प्रभावाने देवांना पुन्हा बल प्राप्त झाले. त्यांनी युद्धात असूरांचा नाश केला व आपले गेलेले स्वर्गाचे स्वराज्य पुन्हा प्राप्त केले. ओमकार अमरेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ ब्रम्हदेव व विष्णू यांनीही निवास केला. त्यामुळे नर्मदेचा हा किनारा ब्रह्मपुरी, विष्णुपुरी व रुद्रपुरी असा त्रिपुरी भाग बनला. रुद्रपुरी मध्ये अमरेश्वर चे ज्योतिर्लिंग आहे.
पुढे काही काळाने इंद्राच्या कृपेने युवा नाश्त पुत्र राजा मलांधा याने तेथे राज्य केले. त्यांनीही भगवान शंकराची फार भक्ती केली त्याच्या या भक्तीने भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले ओमकार ज्योतिर्लिंगाच्या जलहरी म्हणजे पन्हाळा मधून नर्मदेचे पाणी डोंगराच्या खालून घेऊन पुढे अदृश्य रुपात वाहत जाते. हे पाणी त्या शिवलिंगाच्या आसपास होऊनच वाहते या पाण्यात जेव्हा बुडबुडे येऊ लागतात तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले असे भाविक मानतात. मालंधा राजाने येथेआपली राजधानी केल्यामुळे हे तीर्थस्थान ओमकार मालंधा या नावानेही ओळखले जाते. आजही या राजाचे वंशज तेथे राहतात. विंध्य पर्वतानेही कठोर तपश्चर्याकरून भगवान शिवाला प्रसन्न केले होते.
अशी आख्यायिका आहे त्यामुळे विंध्य पर्वतचा हा भाग सुंदर व रमणीय झालेला आहे. अगस्ती ऋषींसारखे अनेक ऋषीमुनींनी या ठिकाणी तप साधना केली होती व आपल्या आश्रम स्थापन केले होते. ऐतिहासिक काळात तर या तीर्थक्षेत्राचे शिलालेख माबलेश्वर मंदिरात कोरलेले आहेत. पुष्पदंताचा शिव महिमा स्तोत्राचा शिलालेख ही येथे दिसून येतो असे म्हणतात की ओंकारेश्वर बेटावर पूर्वी आदिवासी राहत असत. हे स्थान कालिका देवीचे होते देवीचे भक्त भैरवगड या नावाने ओळखले जात व ते यात्रेकरूंना फार त्रास देत असत. तसेच यात्रेकरूनचा बळी दिला जाई.पुढे कालांतराने दरियाई नाथ नावाच्या एका सिद्ध पुरुषांनी या ठिकाणी आपला आश्रम स्थापन केला व त्या भैरवगारांचा त्रास कमी करून त्यांना पायबंध घातला. तेव्हापासून पुन्हा या ठिकाणी यात्रेकरूंचे जाणे जाणे-येणे पूर्ववत सुरू झाली. पुढे काही काळ येथे मुघलांचे राज्य होते. सण १९९५ मध्ये राजा भारत सिंह चौहान यांनी भिल्लराज जिंकून ओंकार माधांताच्या वैभवात भर घातली. या भारत सिंह चौहान राजाच्या राजमहल आजही पडक्या अवस्थेत तेथे उभा आहे. त्याचे वंशज आजही स्वतःला राजा समजून या बेटावर थान मांडून आपला हक्क गाजवत आहे.
ओंकारेश्वर मंदिर परिचय मराठीत Omkareshwar Temple Information In Marathi
दुसरे बाजीराव पेशवे यांनी येथील जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. पेशव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या पुरातन तीर्थक्षेत्री अनेक सुधारणा केल्यात अतिशय सुंदर व मोठे घाट बांधले. व विशेष म्हणजे कोटी लिंग अर्चनाची पद्धत सुरू केली यात 22 ब्राह्मण मिळून तेराशे छिद्र असलेली मोठी लाकडी फळी घेतात ही फळी हातात धरून तिच्या छिद्रांमध्ये मातीची शिवलिंगी बनवून त्याचे पूजन करतात पूजनानंतर नर्मदेच्या प्रवाहात त्या सर्व तेराशे शिवलिंगांचे विसर्जन केले जाते यालाच कोटी लिंग म्हणतात ही पूजा विधी वर्षभर चालू असते. ओमकार मांडत आहे शिवतीर्थ अतिशय सुंदर आहे येथे देखील राहण्याची व्यवस्था आहे आपण या ठिकाणी बस ने किंवा रेल्वेने जाऊ शकतो सर्व शिवभक्तांसाठी हर हर महादेव जय भोलेनाथ ओम नमः शिवाय
ओंकारेश्वराला कसे जातात?
ओंकारेश्वर हे इंदूरपासुन ७७ किमी अंतरावर इंदूर- खांडवा महामार्गावर आहे.
ॐकारेश्वर रोड हे रेल्वेस्थानक गावापासून १२ किमी अंतरावर आहे.
नर्मदा नदीत होड्या सुरू असतात, त्यांतूनही ओंकारेश्वराला पोहोचता येते.
ओंकारेश्वरातील अन्य देवळे
ओंकारेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये चोवीस अवतार, माता घाट (सेलानी), सीता वाटिका, धावड़ी कुंड, मार्कण्डेय शिला, मार्कण्डेय संन्यास आश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञान शाला, बड़े हनुमान, खेड़ापति हनुमान, ओंकार मठ, माता आनंदमयी आश्रम, ऋणमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आड़े हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चॉंद-सूरज दरवाजे, वीरखला, विष्णू मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसिंह टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चन्द्रमोलेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा वगैरे देवळे आहेत.
भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्थान म्हणून ओळख असलेल्या शहरातील ओंकारेश्वर मंदिरावर श्रावण मासानिमित्त शिवभक्तांची गर्दी होणार आहे. ५० वर्षांची परंपरा असलेल्या या शिवस्थानावर श्रावण सोमवार निमित्त स्वयंभू शिवपिंडाच्या दर्शनाचा लाभ भाविकांना दिवसभर होणार आहे.
जयनगरात असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या श्री ओंकारेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवसातून बांधण्यात आलेले हे मंदिर आहे.स्वयंभू शिवपिंड
या मंदिरात स्थापना करण्यासाठी स्वयंभू शिवपिंड असावी अशा मनोदयाने नर्मदा नदी किनारी असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान (मध्यप्रदेश) येथे विश्वस्त गेले. मात्र तेथे स्वयंभू शिवपिंड मिळणे कठीण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विश्वस्त माघारी परतले. काही दिवसांनी तेथून संदेश आला तो स्वयंभू शिवपिंड असण्याचा. त्यानुसार पुन्हा तेथे विश्वस्त गेले व तेथून स्वयंभू शिवपिंड आणून तिच्यासह इतरही मूर्तींची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून येथे शिवभक्तांची गर्दी होऊ लागली व नवसही केले जाऊ लागले. आज राज्यभरात या मंदिराची अख्यायिका पोहचली असून श्रावण मासासह महाशिवरात्र, श्रीराम नवमी, श्रीकृष्णा जन्माष्टमीला येथे राज्यभरातील भाविक हजेरी लावून शिवचरणी लीन होतात.
सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल
हे देवस्थान सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असून फेब्रुवारी २०२०मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त जुगल जोशी यांनी दिली. संस्थानचे अध्यक्ष गजानन पन्नालाल जोशी, सचिन विष्णू जोशी यांच्यासह इतर विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पुढे काही काल येथे मित्रांचेही राज्य आहे सन 1995 मध्ये राजा भरत सिंह चौहान यांनी भिल्ल राज जिंकून कार मागांच्या विरोधात भर घातली या भारत सिंह चव्हाण राजाच्या राजमहल आता आजही पडक्या अवस्थेत इथे उभा आहे त्याचे वंश राजे स्वतः राजा सदर राजा समजून या बेटावर ठाण मांडून आपला हक्क गाजवत आहेत दुसरे बाजीराव पेशवे यांनी येथील जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार केला पेशव्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या पुरातन तीर्थक्षेत्री अनेक सुधारणा केल्या अतिशय सुंदर व मोठे घाट बांधले व विशेष म्हणजे कोटी भिंगारक्षणाची पद्धत सुरू केली या 22 ब्राह्मण घेऊन तेराशे छिद्र असलेली मोठी लाकडी फळी घेऊन ही फळी हातात धरून तिच्या छिद्रांमध्ये मातीची शिवलिंग बनवून त्याचे पूजन करतात पूजनानंतर नर्मदेच्या प्रवाहात त्या सर्व तेराशे शिवलिंगांचे विसर्जन केले जाते यालाच कोटीशिवेल कोटी भिंगारचंद म्हणतात ही पूजा विधी वर्षभर चालू असते ओमकार मांडत आहे शिवतीर्थ अतिशय सुंदर आहे याबाबत आद्य जगद्गुरु आपल्या श्रोतात म्हणतात सज्जनांचा उद्धार करणाऱ्या आणि नर्मदा व कावेरीच्या संगम स्थानी नेहमी निवास करणाऱ्या ओमकार शिवाला माझे प्रणाम जय भोलेनाथ
ओम नमः शिवाय
हर हर महादेव