युरेनस ग्रहाची मराठी माहिती | Uranus Planet Information In Marathi

  • व्यास. 51,119 कि.मी
  • सूर्यापासूनचे अंतर -2,870,972,200 कि.मी
  • सूर्याभोवती एक फेरी 85 वर्ष

सूर्यमालेतील आणखीन दुसऱ्या लांब अंतरावर असणारा ग्रह म्हणजे युरेनस होय.

मराठी भाषेत या ग्रहाला प्रजापती असे म्हटले जाते.

विल्यम हर्षल या शास्त्रज्ञाला आकाशाचे निरीक्षण करीत असताना या ग्रहाचा शोध लागला.

ताऱ्यांसारखे आकारमान असणार परंतु ग्रहा या प्रकारात येणार सूर्यमालेतील हा ग्रहा विल्यम हर्षल ने सन 1781 मध्ये शोधून काढला.

युरेनस चे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तो इतर ग्रहांसारखा स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी प्रदक्षिणा करीत नाही, तर तो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो असे असले तरी त्याची सूर्यप्रदक्षिणा मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडेच होते.

युरेनस ला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किंवा एक प्रदक्षिणा करण्यास 85 वर्ष एवढा कालावधी लागतो.

या ग्रहाचा व्यास 32,219 मैल इतका आहे या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 14.6 पट इतके आहे.

युरेनस ला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 10 तास 45 मिनिटे लागतात.

युरेनस ग्रह सूर्यापासून खूपच दूर अंतरावर असल्यामुळे त्याचे तापमान -185 अंश सेल्सिअस इतके आहे.

Leave a Comment