महात्मा गांधी मराठी माहिती| Mahatma Gandhi information In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत त्यांच्या जीवनचरित्राबद्दल देखील माहिती घेणार आहोत

महात्मा गांधी जीवन परिचय मराठीत

  • संपूर्ण नाव – मोहनदास करमचंद गांधी
  • जन्मतारीख – 2 ऑक्टोंबर 1869
  • जन्मगाव– पोरबंदर
  • आई व वडील – पुतली बाई व करमचंद गांधी
  • चळवळ – भारतीय स्वतंत्र लढा
  • मृत्यू– 30 जानेवारी 1948

त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतली बाई होते.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे कस्तुरबा यांच्याशी लग्न झाले .

12 मार्च 1930 रोजी दांडी येथे जाऊन भारतीय मीठ कायद्याचे उल्लंघन केले.

महात्मा गांधींनी त्याचे नेतृत्व देखील केली महात्मा गांधींना भारतीय चळवळीचे जनक मानले जाते.

भारतीय स्वतंत्र चळवळीचे नेते सुभाष चंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी देखील दिली होती.

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे.

4 जून 1944 रोजी सिंगापूर रेडिओवर प्रक्षेपणात बोस यांनी गांधीजींचा उल्लेख केला.

गांधीजींच्या आशीर्वाद आणि मजबूत व्यक्तिमत्वामुळे भारताला ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्र मिळण्यास मदत झाली.

गांधींचा जन्म ऑक्टोबर २, इ.स. १८६९ या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्‍नी होत्या. आधीच्या तीन पत्‍नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात “त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन” गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व:ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.

बॅरिस्टर

शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही. आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मीळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्‍न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्‌गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.

स्वातंत्र्यसंग्राम

इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.

चंपारण्य व खेड


गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडामध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.

असहकार


गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभूती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला.पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते.

अहमदाबाद येथील कामगार लढा


पहिल्या युद्धानंतर सन 1914 देशात खूप महागाई वाढली होती त्याचवेळी अहमदाबाद येथील कामगारांनी गिरणी मालकाकडे पगार वाढवण्यासाठी मागणी केली होती परंतु त्यांची मागणी गिरणी मार्गाने मान्य केली नाही गांधीजींनी त्यावेळी त्या ठिकाणी जाऊन कामगारांना सांगून तंबाखू पडला व उपोषणाला बसले कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले

स्वराज्या आणि मीठ सत्याग्रह


असहकार चळवळींच्या वेळी अटकेनंतर गांधीजींना फेब्रुवारी 1924 मध्ये सोडण्यात आले आणि ते 1928 पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिले या काळात त्यांनी स्वराज्य पक्ष आणि काँग्रेस मधील वीरकती कमी केली आणि या व्यतिरिक्त अस्पृश्यता मद्यपान अज्ञान आणि दारिद्रतान विरुद्ध लढा दिला 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर मध्ये भारतीय ध्वज फडकवण्यात आला ब्रिटिशांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि काँग्रेसने 26 जानेवारी 1930 ला भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला त्यानंतर मिठावर कर लावण्याचा निषेधार्थ गांधीजी निमित्त सत्याग्रह सुरू केला त्यांनी 12 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान गुजरातच्या अहमदाबाद ते दांडी 388 किलोमीटरचा प्रवास केले याचा हेतू स्वतःहून नीट तयार करणे हा होता यावेळी सरकारने 60 हजार हून अधिक लोकांना अटक करून तुरुंगात पाठविले.

हरिजन चळवळ


दलित नेते भीमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांसाठी वेगवेगळ्या निवडणुकांना नवीन राज्यघटनेत मान्यता दिली याचा निषेध म्हणून सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजींनी येरवडा कारागृहात राहून सहा दिवस उपोषण केले आणि सरकारला एकसमान व्यवस्था अवलंबनास भाग पाडले अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी गांधीजींनी सुरू केलेल्या मोहिमे मी सुरुवात होती आठ मे 1933 रोजी गांधीजींनी आत्मशुद्धीकरणासाठी 21 दिवसांचे उपोषण केले आणि हरिजन चळवळ पुढे नेण्यासाठी एका वर्षाची मोहीम सुरू केली आंबेडकरांच्या सारख्या दलित नेते या चळवळीवर खुश नव्हते आणि गांधीजींनी दलितांसाठी हरिजन हा शब्द वापरण्याची निंदा केली.

महात्मा गांधी यांचा मृत्यू

३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली.

Leave a Comment