नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भैरव गडाच्या कोथळे आणि भैरवगड शिरपूरचे या गडांची माहिती घेणार आहोत ती खालील प्रमाणे हे दोघेही वनदुर्ग या किल्ला प्रकारात मोडतात
हा किल्ला सह्याद्रीच्या सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेला आहे, त्यामुळे दुरून हा किल्ला दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत, त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य “टायगर रिझर्व” घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.
भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणाऱ्या पायवाटेने जावे लागते. किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरूज आणि येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे. पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी बसणारे टेहळे येथे बसून लांबवर नजर ठेऊ शकत असले पाहिजेत. या गुहेमुळे पाऊस वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होत असावे.
गुहेपासून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरूज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.
गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. गडावरून लांबवर पसरलेले कोयनेचे दाट जंगल दिसते.
भैरवगड(कोळथे) किल्ला मराठी माहिती|Bharva gad kolthe fort information in marathi
हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांसाठी जे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी मुख्य मार्ग हा टोलार खिंडीतून जातो. पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोळथे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरव गडाची निर्मिती करण्यात आली असावी. गडाचा आकार आणि रचना पाहता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडावर च्या काळातच झाले असावी. कोळथे या पायऱ्यांच्या गावाजवळ डोंगर रांगा चालू होता. या सर्वात प्रथम एका पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे, या डोंगराला कोळथे नावाने ओळखले जाते. त्यापुढे अजून एक शिखर आहे या शिखरापुढे थोडी सपाटी असलेला भैरवगड आणि त्यापुढे उंच गावठाणाचा डोंगर अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते. भैरवगडावरील भैरव बाहेर स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणाऱ्या दुसऱ्या शिडी खाली आपले पादत्राने काढून आणावीत पायाने गड माथ्यावर जाताना दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते. कोथळे यांचा भैरवगड पाहून टोलार खिंडी मार्गे पाच ते सहा तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते. कोथळे गावातून कोथळे गावाकडे जाताना गावाचा अर्धा किलोमीटर असलेला एक कच्चा रस्ता तोलार खिंडीकडे जातो. येथे हरिश्चंद्रगड, कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे तरच सोलार खिंडाकडे असा बांध दाखवलेला फलक ही बसवलेला आहे. या रस्त्याने दोन मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट शेताकडे जाते या वाटेने आत वळल्या व डाव्या बाजूला झुडपाखाली गवत जवळ देवाची मूर्ती आहे. गडमाथाचा विस्तार छोटा आहे, पण माथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला उत्तरेला भैरवाचा गण आहे त्याच्या बाजूला काही मूर्ती आणि वीरगती ठेवलेल्या आहेत समोरच्या बाजूला गतकाळात कोरलेली पाण्याची टाकी आहे टाक्यांच्या मागे दोन दीपमाळ आहेत भैरोबाच्या मागच्या बाजूला रेलिंग लावलेले आहे तिथून समोर पसरलेला हरिश्चंद्रगडाची वेताळ स्पष्टपणे दिसते भैरवगडावरून पश्चिमेला हरिश्चंद्रगड उत्तरेला शिरपुंजीच्या शिरपुंजाच्या भैरवगड पूर्वेला पुंजरगड दिसतात.
भैरवगड शिरपुंजे मराठी माहिती|Bharva gad shirpunje information in marathi
एकूण सहा भैरवगड आहेत. त्यापैकी दोन भैरवगड हरिश्चंद्राच्या प्रभा वळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखंडी मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोळथाच्या भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजाचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरव गडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा येथे भरते भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरवगडावर जाण्याची वाट व्यवस्थित रुळलेली आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी कातळ कोडी गतकाळात पायऱ्या आणि काही ठिकाणी रेलिंग लावलेले आहेत. या वाटेने एक तासात आपण भैरवगड व त्याच्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीत येऊन पोहोचतो येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे भूतकाळात कोरलेल्या सुंदर पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला काळात कोरलेली चार टाकी आहेत. त्याच्यापुढे एक कोडे टाक आहे, हे पाहून गुहेकडे दक्षिणेकडे जाण्याच्या पायवाटेने चालताना सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मोठा खांब टाक आहे. टाका पर्यंत जाण्यासाठी मार्गही त्या काळातच कोरूनच बनवलेला आहे. या टाक्यांच्या बाजूला एक रांजण खडका कोरलेला आहे तर टाक्यांच्या वरच्या बाजूला तीन रांजणखळगे खोदलेले आहेत टाक आणि गुहा पासून परत पायवाटेवर येऊन उत्तरेला भैरोबाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजूला एक साडेचार फूट उंच विरघळ आहे. पुढे डाव्या बाजूला गुहेच्या वरच्या बाजूला एक विरघळ आहे. या वीरगळीच्या चारही बाजू कोडलेल्या आहेत. विरगळी जवळ गणपतीची झिजलेली मूर्ती शेंदूर लावून ठेवलेले आहे ते पाहून त्या काळातच खोदलेल्या पायऱ्या उतरून कड्याच्या टोकावर फोडलेल्या भैरोबाच्या गुहे गुहेत जाताना बाहेरच्या बाजूला एक विरघळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. भैरोबाच्या गोव्याच्या बाजूला असलेल्या गुहेत दहा जण राहू शकतात. कडेच्या गुहेच्या कड्यावरील बाजूला रेलिंग लावलेले आहे येथून शिरपुंजे गाव आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. गळ माथ्यावरून दक्षिणेला हरिश्चंद्रगड पाथरगड हे किल्ले दिसतात. आपण इथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला एका बाजूला ४ तर दुसर्या बाजूला 5 अशी एकूण नऊ पाण्याची टाकी लागतात. याच टाक्यांच्या पुढे एक गुहा देखील लागते ती कदाचित धान्यकोठार असू शकेल असा अंदाज व्यक्त केल जातो. गुहेच्या दरवाजासमोर आपल्याला जंग्यासारखे एक छिद्र पाहायला मिळते.पुढे आपण जमिनीच्या खाली कातळात कोरलेल्या भैरवनाथाचे दर्शन घ्यायचे.बऱ्याच ऐतिहासिक गड भ्रमंती पुस्तकांत या गडावरील देवाच्या मूर्तीला खंडोबा म्हणले आहे. परंतु हि मूर्ती खंडोबाची नसून हि भैरवनाथाची ६ फुट उंच सुंदर रंगवलेली कातळकोरीव मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मूर्तीचे दर्शन घेऊन शेजारची दुसरी गुहा बघायची, याच गुहे मध्ये भटक्यांची राहण्याची सोय होऊ शकते. इतकच नाही तर इथे जेवण बनवण्यासाठी भांडे व चूल देखील आपल्याला मिळेल.आता आपण गडाच्या बालेकिल्ल्याकडे जायला निघायचे. समोर वाटेत आपल्याला दोन विरगळ लागतात आणि या अवाढव्य विरगळ कोणाच्या आहेत याची माहिती कोठेही नाहीये. इथेच गणेशाची मूर्ती आणि इतर शेंदूर लावलेले दगड बघायला मिळतील.गडाच्या बालेकिल्ल्यावर म्हणजेच माथ्यावर आपल्याला काही घरांचे चौथरे आणि तटबंदी बघायला मिळते. वाटेत एक गुहा आपल्याला लागते, हि गुहाच आहे पाण्याची टाके नाहीये. सध्या पाणी साचलेले असले तरी हि गुहाच आहे. इथली खांबांची रचना आणि नक्षीकाम बघण्यासारखे आहे. हे सर्व बघून आपण परतीच्या मार्गाला लागायचे.गडफेरी पूर्ण करायला सरासरी एक तास पुरेसा असतो.
भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे. मंदिर मजबूत आणि कौलांनी साकारलेले आहे. मंदिरात भैरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत.
या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोर खाली उतरणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे.
या दरवाजतून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणाऱ्या टेकडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसतं.
गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणाऱ्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.