नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे श्री गणेश हे भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचे पुत्र आहेत आता आपण त्यांचा जन्म कसा झाला व त्यांना गजानन हे नाव कसे पडले आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत व त्यांना कोणत्याही कार्यात सर्वप्रथम का पूजले जाते याची माहिती घेणार आहोत
श्री गणेश यांच्या जन्माची कथा
माता पार्वती यांना पुत्राची अभिलाषा होती त्यामुळे त्यांनी श्री गणेश यांना त्यांच्या पार्वती मातेच्या अंगाचा मळ व सुगंधित उटणेयांना पासून एक सुरेख मूर्ती तयार केली व त्या मूर्तींमध्ये जिवंतपणा आला व तेच आपले श्री गणेश यांचे यांचा जन्म झाला.
श्री गणेश यांना गजानन हे नाव कसे पडले?
एकदा माता-पार्वती ह्या आंघोळीसाठी गेलेल्या असताना त्यांनी श्री गणेशाला सांगितले होते की माझ्या आज्ञे शिवाय कोणालाही आत सोडायचे नाही. त्यावेळेस तिथे भगवान शिवशंकर आले व त्यांनी आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी द्वारावर असलेल्या श्री गणेश यांनी त्यांना सांगितले की तुम्ही आत जाऊ शकत नाही. माझी माता अंघोळ स्नान करत आहे. व तिच्या आज्ञे शिवाय मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही त्यावेळेस शिवशंकर म्हणाले ही आज्ञा इतरांसाठी आहे परंतु माझ्यासाठी नाही इतरांसाठी असेल माझ्यासाठी नाही त्यावर श्री गणेश म्हणाले की मी माझ्या मातीची आज्ञा मोडू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. त्यामुळे शिवशंकर व श्री गणेश यांच्यामध्ये युद्ध झाले. शिवशंकर अतिशय क्रोधीत होऊन त्यांनी श्री गणेशाचे मुख म्हणजे तोंड हे त्यांच्या शरीरापासून वेगळे केले. श्री गणेश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माता पार्वती ह्या बाहेर आल्या व त्यांनी त्यांच्या पुत्राला म्हणजे श्री गणेशाला मृत अवस्थेत पाहिले, त्यावेळेस त्यांनी पार्वती मातेने शिव शंकरांना सांगितले की तुम्ही माझ्या पुत्राला आताच्या आता जिवंत करा त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी माझ्याकडून फार मोठा अपराध झाला आहे. त्यामुळे मी याला जिवंत करेल असे पार्वती मातेला वचन दिले, व त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला की उत्तरेकडे जो कोणता सजीव तुम्हाला पहिले दिसेल, त्याचे शीर तुम्ही इथे घेऊन या. शिव शंकराच्या गणांनी भरपूर तपास केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक गज म्हणजेच हत्तीचे लहान बालक सापडले. व त्यांनी त्याचे शीर तोडून आणले. व शिवशंकरांकडे दिली शिवशंकरांनी ते शिर म्हणजे ते मुख श्री गजानन लावले व ते गजमुख म्हणून प्रसिद्ध झाले.
श्री गजानना यांना कोणत्याही कार्यात सर्वप्रथम का पूजले जाते?
ज्यावेळेस शिवशंकरांनी श्री गणेशांना गज म्हणजेच हत्तीचे मुख लावल्यानंतर त्यांना जीवनदान दिल्यानंतर श्री गणेश यांनी त्यांना सांगितले की मला हे मुख म्हणजेच चेहरा नको आहेत. मला माझे मुख चेहरा चेहरा पाहिजे. त्यावेळेस भगवान शिवशंकर म्हणाले ते शक्य नाही, परंतु मी तुला असा वरदान देतो की कोणतेही शुभकार्याची सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम तुझे पूजन केले जाईल. त्यानंतरच कोणत्याही देवाचे किंवा देवी देवतांचे पूजन केले जातील. तेव्हापासून श्री गणेश यांचे कोणत्याही कार्यात प्रथम पूजन केले जाते. व त्यानंतरच बाकीचा विधी केला जातो.