कार्ले लेणी मराठी माहिती|Karlyachi Leni Information In marathi


कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे.

येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. ह्याशिवाय सभामंडपाच्या ओवऱ्यांच्या स्तंभांवर घोडेस्वारांच्या मूर्ती आणि विविध प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. एका भिंतीवर तीन गजराज उभे असून त्यांच्या वरखाली जाळीदार नक्षी कोरलेली आहे. येथील लेण्यांत बुध्दाच्या अनेक मूर्ती आहेत तसेच भिंतीवर स्त्रीपुरुष नर्तकांची युगुले कोरलेली आहेत. दर्शनी भागावरील महाव्दारावर मिथुनशिल्प काढलेले आहे. चैत्यगृहाच्या छपराच्या आतील भागावर काष्ठकाम, काही स्तंभ आणि भिंतीवर पुसट भितिचित्रे आढळतात. हयांवरून पूर्वी येथे भरपूर काष्ठशिल्पे व भित्तिचित्रे असावीत.

हया लेण्यांत भिन्नभिन्न काळातील सु. बावीस शिलालेख उपलब्ध झाले आहेत. त्यांतील एका

लेखानुसार हे चैत्यगृह म्हणजे ‘जम्बुव्दीपातील अव्दितीय लेणे’ असे म्हटले आहे आणि ते वैजयंतीच्या भूतपाल श्रेष्ठीने खोदविले, असा त्यात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सिंहस्तभांवरील लेखानुसार हा स्तभ महाराथी अग्निमित्राने दान म्हणून उभा केल्याची माहिती मिळते. तसेच नहपान क्षत्रपाचा जावई उषवदात सु. १२० द्ध व पुळुमावी सातवाहन हयांचेही येथे लेख आहेतबौद्ध वास्तुशास्त्र भित्ती चित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेली चैत्य दालने किंवा प्रार्थना गृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्षु वारंपत असलेले विहार किंवा आश्रम यांचा समावेश आहे.
लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या सुंदर चित्रांमधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण केलेले आढळते. विशेष लक्षणीय म्हणून नमूद करण्याजोगे चित्रांमध्ये बोधिसत्वाच्या रूपात अवतीर्ण झालेल्या भगवान बुद्धाच्या पूर्व जन्मातील नानाविध घटनांवर आधारित जाचक कथांचा

सर्व प्रथम आपणास बौद्ध भिक्षूंचे खडकात खोदलेले मठ दिसतात. थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला एकविरा देवीचे मंदिर दिसेल. मंदिराच्या बाजूलाच एक मोठे चैत्यग्रह आहे, त्याची उंची अकरा मीटर रुंदी अकरा मीटर आणि लांबी चाळीस मीटर आहे. लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात बैध्द भिक्षूंनी केली असावी. चैत्यग्रहातील काष्टकाम व चिञलेख आकर्षक आहेत. चैत्यग्रह आकर्षक आसुन हॉलच्या खांबावर घोड्यांची शिल्प कोरलेले आहेत तसेच विविध प्रसंगांचे प्रतीकात्मक चित्र पहायला मिळतात.येथे ब्राम्ही लिपीत लेख लिहलेला आहे, तसेच बुध्दांची मुर्ती पहायला मिळते . चैत्यग्रहाचा बाहेरील भिंतींवर स्ञी पुरुषांची भित्ती चिञे आहेत,तसेच बाजूच्या भिंतीकडे तिन हत्तींच्या मूर्ती असुन भिंतींवर वरखाली उत्कृष्ट जाळीदार नक्षी कोरलेली आहे. सिंह स्तंभ इथल्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे, स्तंभाची उंची जास्त आहे व वरील बाजूस सिंहा चे शिल्प कोरलेले आहे.

रचना


हा लेणी सोळा लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा भाषेतील लेख दिसतो. मुंबई गोमांतक महामार्गावर महाड जवळ ही लेणी गांधार पार्ले नावाच्या छोट्या वस्ती जवळ आहे. त्याची उंची 60 मीटर आहे. येथे एकूण 28 लेणी आहेत. ही लेणी विष्णू पुलित राजाच्या काळात  इ.स 130 च्या सुमारास खोदली गेली असावी, असा अंदाज आहे. येथील लेण्यात अलंकारिक तसेच रंगवलेली मूर्ती नाही, परंतु येथील स्तूप, बुद्धमूर्ती, डमरू वाले, भिंतीत कोरलेले बाळ व कोरीव मूर्ती पाहण्यासारखे आहे.

चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत.कार्ला लेण्या या बौध्दीष्ट लेण्या आहेत. या एकुण 16 लेण्या आहेत. बर्‍याच लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या हिनयान टप्प्यातील आहेत. यातील तीन लेण्या या बौद्ध धर्माच्या महायान टप्प्यातील आहेत. या लेण्यांमध्ये चैत्यगृह ही मुख्य लेणी आहे. चैत्यगृह हे त्या काळचे एक भव्य प्रार्थणा स्थळ होते. चैत्यगृहाची निर्मीती इ.स.पू. पहील्या शतकात झाली होती. चैत्यगृहाच्या छतामध्ये लाकडाचे कोरीव काम पाहण्यास मिळते. चैत्यगृहात डाव्या आणि उजव्या बाजुस नक्षीदार कोरलेले खांब आपणास पाहण्यास मिळतात. या खांबांवर पुरुष, स्त्री, हत्ती, घोडे यांचे शिल्प पाहण्यास मिळते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या खिडकीतुन सुर्यप्रकाश आत येतो आणि थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तुपावर पडतो.

इतर 15 लेण्या या आकाराने लहान आहेत, यांना विहार म्हटले जाते. यांचा वापर राहण्यासाठी व प्रार्थनास्थळ म्हनुन केला जात असे. या लेण्या गौतम बुध्दांना संबोधतात. येथील प्रवेशद्वाराजवळ सिंहांचा एक विशाल स्तंभ आहे, जो उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या सिंहाच्या स्तंभाची आठवन करुन देतो.

लेख


कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत. या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे डहाणू, सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या काठेवाड भागातील प्रभासतीर्थ वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे.
कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.

जर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करत असाल तर जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही कार्लाला पोहोचू शकता, जर तुमच्याकडे खासगी वाहन नसेल तर ट्रेन उत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर मळवली जवळील रेल्वे स्थानक आहे. स्थानका बाहेरून रिक्षा पकडुन तुम्ही कार्ला ला जाऊ शकता. लोणावळा येथून बसचीही सुविधा आहे. कार पार्किंग पासून काही पायरी चढून गेल्यावर तिकीट घर असून. लेण्या पाहण्यासाठी तिकिट आवश्यक आहे, तिकीट दर भारतीय लोकांसाठी 25 रुपये आणि परदेशी लोकांसाठी 300 रुपये आहेत.

Leave a Comment