औरंगाबाद शहरापासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर रमनीय सृष्टी सौंदर्याने नटलेल्या एका प्रचंड नालाकार घडी मध्ये खडकात कोरलेली अजिंठा लेणी वसलेली आहे.
बौद्ध वास्तुशास्त्र भित्ती चित्रे आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेली चैत्य दालने किंवा प्रार्थना गृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्षु वारंपत असलेले विहार किंवा आश्रम यांचा समावेश आहे.
लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या सुंदर चित्रांमधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण केलेले आढळते. विशेष लक्षणीय म्हणून नमूद करण्याजोगे चित्रांमध्ये बोधिसत्वाच्या रूपात अवतीर्ण झालेल्या भगवान बुद्धाच्या पूर्व जन्मातील नानाविध घटनांवर आधारित जाचक कथांचा उल्लेख करता येईल.
जवळपास सातशे वर्षे वापरात असलेले अजिंठा लेणी काहीशी अचानक सोडून दिली गेल्याचे दिसते त्यानंतर जवळजवळ 1000 वर्षांहून ही अधिक काळ अज्ञात राहिलेली ही लेणी 1819 वर्षी शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याच्या अवचितपणे नजरेस पडली आणि पुन्हा प्रकाशात आली.
सप्त कुंड
डोंगरावरून फेसाळत खाली कोसळणाऱ्या सात धबधब्याचे पाणी जेथे एकत्र येते तो सप्त कुंड नावाचा तलाव लेण्यांच्या पायथ्याशी आहे.
एकूण 29 लेण्यांपैकी पाच लेण्या 9,10, 19, 26, 29 चैत्य म्हणजे (पूजा स्थळ) म्हणून आणि उर्वरित विहार (आश्रम) म्हणून प्रसिद्ध आहे.
छतावरील पेंटिंग कलेतील वेगवेगळ्या छटा बारकाईने दाखवलेल्या आहेत उदाहरणार्थ फुले, झाडी, फळे ,पक्षी ,जनावरे, मानव व अर्थमानव हे बघितल्यावर त्यांचे त्या विषयावर असलेले प्रभुत्व दिसून येते. पेंटिंग विषयी विचार केल्यास असे दिसून येते की प्रथम धातू मिश्रित माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण वनस्पती, पदार्थांचे तंतू,तांदळाचा भुसा,गवत, लहान वाळू वगैरे गोष्टींचा ते भिंती किंवा छतांवर लेप देऊन पेंटिंग पूर्वीचा पाया तयार करीत, शेवटी लिंबू पाण्याने तो पृष्ठभाग धुतल्यानंतर ती भिंत किंवा छत पेंटिंग करिता तयार होत असे. रंग देण्याची पद्धत सुद्धा सरळ व सुटसुटीत होती पेंटिंग च्या आधी आऊटलाईन काढून त्यात वेगवेगळे रंग चिकटवण्यात येत येथील रंगसंगती ही एका विशिष्ट पद्धतीची नसून तेथे आवश्यक आहे तेथे जे आवश्यक आहे ते व तेच व तेवढेच रंग वापरले आहेत. त्यामुळे येथील चित्रशैली ही जगात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.
आता आपण लेण्या बद्दल माहिती घेऊया
लेणी क्रमांक 1
या लेणीत 20 खांबांवर आधारित एक दालन आहे खांबावर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे चित्रात जातक कथा आदर्श दिलेले असून ज्या महात्मा बुद्धाच्या पूर्व जन्मावर आधारित आहेत पूजा स्थळी बुद्धाची एक विशाल मूर्ती आहे जिच्या चेहऱ्यावर उजव्या, डाव्या आणि समोरील बाजूंनी प्रकाशझोत टाकल्यास गंभीर, तपस्या आणि शांती असे वेगवेगळे भावप्रदर्शित होतात.
बाहेरील भिंतींवर मोराचे चित्र आहे, जो प्रेमदेवता आहे. आणि बुद्धास आपल्या उद्दिष्टांपासून रोखून ठेवत आहे व तपस्या न करण्या सांगत आहे. एका दुसऱ्या चित्रात बुद्धाच्या अनेक मुद्रा दर्शविण्यात आले आहेत. सभा दालन जो डाव्या बाजूस आहे, येथे शिबी जातक कथा दर्शविलेली आहे. ज्यात राजा शिबिर एका कबुतराचे ससाण्यापासून संरक्षण करीत आहे. राजा नागराज याची जन्म कथा व एक महिला जी रथात बसलेली आहे. हे दृश्यही त्याच ठिकाणी आहे. पूजा स्थाना जवळच्या भिंतींवर जगप्रसिद्ध पद्मपाणीची मुद्रा दर्शविलेली आहे. महात्मा बुद्धाचे हे प्रसिद्ध चित्र इटालियन समकालीन युगातील चित्रांप्रमाणे जगप्रसिद्ध आहे.
एका दरबाराचे दृश्य दर्शविण्यात आले आहे. त्याच्यात विदेशी महत्त्वकांक्षी लोक भारतीय राजांना नजरांना भेट करत आहेत. बुद्धाची माता मायावतीचे स्नान करतानाचे चित्र आहे याशिवाय आखाड्यात काही जनावरे लढत आहेत. असे चित्र तसेच छतावर कित्येक पक्षी, फूल आणि फळांचे चित्र आहेत ते उत्कृष्टपणे चितारलेले व कोरलेले आहेत. यात काही रंगीत आहेत या डिझाईन पैठणी साडी आणि हिमरू शालींवर काढण्यात येतात. आणखीन काही दृश्य दाखवण्यात आलेले आहेत ज्यात राणी अरुंधती झोका घेत असताना दृष्टीस पडते. असेच एक अद्भुत चित्र सांडाचे आहे. ज्यास कोणत्याही कोणातून पाहिले असता पाहणाऱ्यास असे वाटते की तो आपल्यावर आक्रमण करून येत आहे.
लेणी क्रमांक 2
या लेणीच्या डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा दर्शविण्यात आली आहे बुद्धाची माता आपले स्वप्न राजा सांगत आहे. बुद्धाचा जन्म आणि बुद्धाची माता – पिता त्यांच्यावर प्रेम करताना चित्र चित्रित करण्यात आले आहेत. डाव्या बाजूस एका खोलीत बुद्धाची मूर्ती आहे.ज्याच्या छतावर हंस पक्षाचा थवा दर्शविण्यात आला आहे.इतर चित्रात आजच्या युगातील उपयोगात येणाऱ्या कित्येक वस्तू दाखवण्यात आला आहेत जसे मफलर, पर्स आणि स्लीपर.
पूजा स्थळावर बुद्धाची आकृती आहे. काही सुंदर चित्रित करण्यात आले आहेत छतावर सुंदर नक्षीचे चित्रण केले आहे. या नक्षीकामाच्या डिझाईनची नक्कल आजकाल साडी आणि शालींवर करण्यात येते. सभा दालनात कित्येक खांब आहे.
लेणी क्रमांक 3
अपूर्ण आहे.
लेणी क्रमांक 4
ही सर्वात विशाल लेणी आहे ज्यात 28 खांब आहेत दारावर द्वारपालांची जोडी दर्शविण्यात आली आहेत आत आत पूजा स्थळी महात्मा बुद्धाच्या सहा प्रचंड मूर्ती आहेत जी अष्ट भयान पासून संरक्षण करत आहे असे दृष्टीस पडते.
लेणी क्रमांक 5
ही लेणी अपूर्ण असून यात काही बुद्धाच्या आकृत्या आहेत.
लेणी क्रमांक 6
ही लेणी दोन मजली आहे सभा कक्षात बुद्धाची पद्मासन मुद्रेत आकृती आहे. दुसऱ्या मजल्यावर सभा भावनात खांब आहेत. प्रवेशद्वारावर मगरीचे आणि फुलांचे अर्धा गोलाकार बनवलेले आहेत.
लेणी क्रमांक 7
या लेणी पूजास्थानी असं नसतं बुद्धाची मूर्ती असून मागील भिंतीवर प्रभामंडळ फोडण्यात आले आहे.
लेणी क्रमांक 8
या लेणीत काहीच नाही या ठिकाणी पर्यटन विभागाचे विद्युत गृह स्थापित केलेले आहेत.
लेणी क्रमांक 9
या काटकोनाकार रचना असलेल्या चेत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. भिंतीवर अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष बुद्धाच्या विविध रूपातील भाव मुद्रांचे दर्शन घडवितात.
लेणी क्रमांक 10
ही लेणी एक ही मंदिर आहे.ज्यात जवळपास 40 खांब आहेत. ज्यावर उत्कृष्ट करू काम केलेले आहे. येथे एक स्तूप आहे. ज्यावर पाली भाषेतील ब्राह्मणी लिपीमध्ये लेख कोरलेले आहेत. या लेखावरून स्पष्ट होते की या लेण्यांची निर्मिती इ.स पूर्व दोन शतकांत अगोदर झालेल्या झालेली आहे. या लेखात असेही दर्शवण्यात आले आहे, की या लेणीचा दर्शनी भाग बांबू – लाकूड व्यापाराने स्वतःच्या जबाबदारीवर काढला होता.
लेणी क्रमांक 11
या लेणीचा सभामंडप फार मोठा आहे. आतील भागात पूजा स्थानी भगवान बुद्धाची आकृती आहे
लेणी क्रमांक 12 ते 15
या लेण्यात विशेष असे काहीच नाही.
लेणी क्रमांक 16
या लेणीत फारच महत्त्वपूर्ण चित्रे आहेत. यात बुद्धाच्या जीवनावरील घटना दर्शविण्यात आले आहेत. डाव्या बाजूला एकादशी बुद्धाचे चुलत बंधू नंद दाखवण्यात आले आहेत. जे सांसारिक सुखाचा त्याग करून भिक्षुक बनलेले आहेत. एका चित्रात नंदाची माता दाखविण्यात आलेली असून ती मृच्छीत पडलेली आहे.एक नर्स तिची देखरेख करीत आहे आश्चर्याची गोष्ट ही आहे की नर्सचा पेहराव तोच आहे जो आजकाल उपयोगात आणला जातो. कथकली नृत्याचे चित्र प्रशासनीय आहे. आज पूजास्थानी बुद्धाची विशाल आकृती आहे. हत्ती, घोडे, मगरीचे चित्र पहावयास मिळतात जे सुंदर आहेत.छतावरील चित्रकला सुंदर आणि आकर्षक आहे. एक चित्र बुद्धाच्या मातेचे आहे ज्यात ती आपल्या पतीस स्वप्न सांगत असून ज्योतिषी व स्वप्नचा अर्थ सांगत आहे. या चित्रावर थ्रीडीचा प्रभाव आहे.
लेणी क्रमांक 17
या लेणी बुद्धाच्या जीवनावरील कित्येक घटना आणि जाचक कथा दर्शविण्यात आले आहेत सभा भवानी सुंदर आहे व पूजा स्थानात बुद्धाची आकृती आहे डाव्या बाजूस बुद्धाची आकृती आहे डाव्या बाजूस बुद्धाच्या पूर्व जन्माचे चित्र असून ते एका हत्तीचे आहे ज्याच्या अनेक सोंडी आहेत नंतर मुंग्या झाडावर चढत आहेत असे दृश्य आहे महाकवी कथेत बुद्धास वानराच्या जन्मी दाखवण्यात आले आहेत.
लेणी क्रमांक 18
ही एक रिकामी खोली आहे ज्यात पाण्याचे तळे आहेत लेणी क्रमांक एकोणावीस हे एक घोड्याच्या नालेच्या आकाराचे मंदिर आहे बुद्धाच्या आकृत्या आहेत आणि नागराजा आपल्या पत्नी समवेत दर्शविलेली आहे दर्शविलेले आहेत डाव्या बाजूस बुद्ध आपल्या पत्नी आणि पुत्राकडून दीक्षा घेत आहे असे दृष्टीस पडते तीन छत्रीचे एक स्तूप असून त्यावर बुद्धाच्या आकृत्या कोरलेले आहेत त्यांनी
लेणी क्रमांक 20
पूजा स्थानात बुद्ध प्रचार करीत आहेत.
लेणी क्रमांक 21
अंशतः अपूर्ण राहिलेले या विहारांमध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले स्तंभ पहावयास मिळतात डावीकडील भिंतीवर बुद्ध आपल्या श्रेष्ठ वनांना प्रवचन देत असल्याचा चित्रखंड आहे
लेणी क्रमांक 23
ही लेणी अपूर्ण आहे परंतु खांबावर कलात्मक सुंदर कलाकृती आहेत .
लेणी क्रमांक 24
ही लेणी जर अपूर्ण राहिली नसती तर सर्वात उत्कृष्ट लेणी म्हणून ओळखली गेली असती. ही लेणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठी आहे. याची भव्य आणि कलात्मकता सुंदर असून
प्रशासकीय आहे ओसरीमध्ये जलदेवता नागराज द्वार रक्षक आदींची अतिशय लक्षणीय शिल्पे कोरलेली आहेत.
लेणी क्रमांक 25
हे एक अपूर्णविहार आहे ज्यात एकही पूजा स्थान नाही व कक्ष नाही फक्त एक अंगण आहे.
लेणी क्रमांक 26
या लेणीत बुद्धाच्या जीवनावर आधारित दोन चित्र आहेत जे डाव्या बाजूच्या भिंतीवर आहेत पहिल्या चित्रात बुद्धाचे चित्र असून ते महापरिनिर्वाण मुद्रे दर्शवण्यात आले आहेत दुसऱ्या बाजूस बुद्ध एका वृक्षा खाली बसलेले आहेत बारा आपल्या राक्षसी शक्तीसह येथे पोहोचतो व नंतर मारा आपल्या राक्षसी शक्तीस परत घेऊन जातो.
लेणी क्रमांक 27
ही लेणी लहान आहे लेणी क्रमांक 26 चा एक भाग आहे असे वाटते.ही लेणी दोन मजली असून मोडतोड झालेली आहे. दुसरा मजलाही अपूर्ण आहे.
लेणी क्रमांक 28 व 29
या दोन लेण्या उंच दगडावर दगडाच्या वर आहेत. त्यात पाहण्यासारखे विशेष असे काहीच नाही.
लेणी क्रमांक 28 मध्ये एक आंगण व स्तंभ स्तंभ आहे व लेणी क्रमांक 29 मध्ये फक्त खोदकाम झालेले आहे.परंतु तेच पर्यंत जाण्यास पायऱ्या नाहीत.